IPL Final 2024 : शाहरुखनं डाव टाकला, गंभीरचं कमबॅक अन् केकेआर फायनलमध्ये, तिसरं विजेतेपद एका पावलावर...
KKR vs SRH : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद फायनलमध्ये आमने सामने येणार आहेत. केकेआरला फायलनमध्ये पोहोचवण्यात गंभीरचं महत्त्वाचं योगदान आहे.
चेन्नई : आयपीएलच्या 17 व्या पर्वाची फायनल (IPL Final) आज चेन्नईतील एमए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hydrabad) यांच्यात अंतिम सामन्याची लढत होईल. आयपीएल फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला पोहोचवण्या मागं मेंटॉर गौतम गंभीरचं मोठं योगदान आहे. केकेआरला यापूर्वी दोनवेळा विजेतेपद मिळवून देणारा गौतम गंभीर (Gautam Gambhir) पुन्हा एकदा केकेआरशी जोडला गेला अन् टीमनं थेट अंतिम फेरीत धडक दिली आहे.
गौतम गंभीर यापूर्वीच्या दोन आयपीएल स्पर्धांमध्ये लखनौ सुपर जाएंटससोबत मेंटॉर म्हणून काम करत होता. त्या दोन्ही आयपीएलमध्ये लखनौनं प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. केकेआरचा संघमालक शाहरुख खानच्या विनंतीवरुन गौतम गंभीर पुन्हा एकदा केकेआरसोबत जोडला जाणार असल्याची घोषणा नोव्हेंबर 2023 मध्ये करण्यात आली. गौतम गंभीर पुन्हा एकदा केकेआरसोबत जोडला जाताच त्यानं मोठे निर्णय घेतले. त्यापैकी एक निर्णय म्हणजे सुनील नरेनला सलामीला फलंदाजीला पाठवणं हा होय. या निर्णयाचा फायदा केकेआरला झाल्याचं दिसून आलं.
गौतम गंभीरनं सुनील नरेनला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा केकेआरला झाला. सुनील नरेननं फिल सॉल्टसह केकेआरला दमदार सुरुवात करुन दिली. एका मॅचमध्ये सुनील नरेननं शतक देखील झळकावलं. गौतम गंभीर यापूर्वी जेव्हा केकेआरसोबत काम करत होता त्यावेळी देखील सुनील नरेनला फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवण्याच प्रयोग करण्यात आला होता.
गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात केकेआरला दोनदा विजेतेपद
गौतम गंभीरनं कोलकाता नाईट रायडर्सला दोनवेळा विजेतपद मिळवून दिलं आहे. 2012 आणि 2014 च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएलचं विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे. गौतम गंभीरमुळं यापूर्वी केकेआर पाचवेळा प्लेऑफमध्ये पोहोचली होती. आता गौतम गंभीर पुन्हा एकदा केकेआरसोबत मेंटॉर म्हणून काम करु लागताच त्यांनी अंतिम फेरीच्या लढतीत धडक दिली आहे. केकेआर आता आयपीएल विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. शाहरुख खाननं देखील गौतम गंभीरची यापूर्वीच्या आयपीएलमध्ये कमी जाणवल्याचं म्हटलं होतं.
केकेआर आयपीएल विजेतेपदापासून एक पाऊल दूर
कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्या आयपीएल विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. सनरायजर्स हैदराबादला पराभूत करुन त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळं केकेआर आजच्या मॅचमध्ये क्वालिफायर-1 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करतात का ते पाहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :