IPL Auction 2024 : मुंबईची पलटन तयार! दिलशान मधुशंकासह अनेक खेळाडू मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील
यंदाचा मुंबईचा संघ कसा असणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तसेच हार्दिक पांड्यांच्या नेतृत्वात मुंबईच्या संघातील कोणत्या खेळाडूंच नशिब खुलणार आणि कोणाला नशिब आजमवायची संधी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
मुंबई : संपूर्ण भारतीय ज्याची अगदी उत्सुकतेने वाट पाहत असतात तो आयपीएल 2024 (IPL 2024) हंगाम अवघ्या काही महिन्यांत सुरु होणार आहे. पण त्याआधी आयपीएल 2024 साठी आज दुबईमध्ये लिलाव (IPL Auction 2024) पार पडला. यामध्ये अनेक संघांनी अगदी उत्स्फुर्तरित्या सहभाग नोंदवला. त्याचवेळी मुंबईच्या संघानेही (Mumbai Indians) त्यांचा ताफा तयार केला आहे. खरंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार पद सोडल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांमधून नाराजीचे सूर उमटू लागले. त्यामुळे यंदाचा मुंबईचा संघ कसा असणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तसेच हार्दिक पांड्यांच्या (Hardik Pandya) नेतृत्वात मुंबईच्या संघातील कोणत्या खेळाडूंच नशिब खुलणार आणि कोणाला नशिब आजमवायची संधी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
लिलावात (IPL Auction 2024) अनेक विक्रम मोडीत निघाले. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यावरही 20 कोटींपेक्षा जास्त बोली लागली. स्टिव्ह स्मिथ, शाकीब अल हसन यासारखे दिग्गज मात्र अनसोल्ड राहिले. आयपीएलच्या 10 संघांनी आज 72 खेळाडू खरेदी केले. यामध्ये 30 खेळाडू विदेशी आहेत. दहा संघांनी 72 खेळाडूंवर 230 कोटी रुपये खर्च केले. कोलकाता संघाने आजचा आणि आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू खरेदी केला.
Mumbai Indians Retained Players: मुंबई इंडियन्सचे शिलेदार कोण कोणते ?
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड (ट्रेड), शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (ट्रेड)
Mumbai Indians Retained Players: Akash Madhwal, Arjun Tendulkar, Dewald Brevis, Ishan Kishan, Jason Behrendorff, Jasprit Bumrah, Kumar Kartikeya Singh, N. Tilak Varma, Nehal Wadhera, Piyush Chawla, Rohit Sharma, Romario Shepherd (T), Shams Mulani, Surya Kumar Yadav, Tim David, Vishnu Vinod, Hardik Pandya (T)
मुंबईने लिलावात कोणत्या खेळाडूवर डाव खेळला?
गेराल्ड कोएत्जी Gerald Coetzee (5 कोटी)
नुवान तुषारा Nuwan Thushara (4.80 कोटी)
दिलशान मधुशंका Dilshan Madushanka ( 4.6 कोटी)
मोहम्मद नबी Mohammad Nabi (1.5 कोटी)
श्रेयस गोपाल Shreyas Gopal (20 लाख)
नमन धीर Naman Dhir (20 लाख)
अंशुल कंबोज Anshul Kamboj ( 20 लाख )
शिवालीक शर्मा Shivalik Sharma (20 लाख)
Mumbai Indians squad for IPL 2024. pic.twitter.com/FIUCLirqSz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 19, 2023