IPL Auction 2024 : मराठमोळा शार्दुल ठाकुर ते विश्वचषक गाजवणारा न्यूझीलंडचा रचिन रवींद्र, आयपीएल 2024 साठी चेन्नईचा संघ तयार
IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ तयार झाला असून आजच्या लिलावामध्ये चेन्नईने एकूण 6 खेळाडू विकत घेतले आहेत.
मुंबई : संपूर्ण भारतीय ज्याची अगदी उत्सुकतेने वाट पाहत असतात तो आयपीएल 2024 (IPL 2024) हंगाम अवघ्या काही महिन्यांत सुरु होणार आहे. पण त्याआधी आयपीएल 2024 साठी आज दुबईमध्ये लिलाव (IPL Auction 2024) पार पडला. यामध्ये अनेक संघांनी अगदी उत्स्फुर्तरित्या सहभाग नोंदवला. त्याचवेळी चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघानेही त्यांचा ताफा तयार केला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंची मंदियाळी चेन्नईच्या संघात आहे. तसेच अनेक नवी आणि नवख्या खेळाडूंना देखील संघाने त्यांच्या ताफ्यात सामील करुन घेतलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या संघात कोणाचं नशिब खुलणार आणि कोणाला नशिब आजमवायची संधी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
लिलावात (IPL Auction 2024) अनेक विक्रम मोडीत निघाले. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यावरही 20 कोटींपेक्षा जास्त बोली लागली. स्टिव्ह स्मिथ, शाकीब अल हसन यासारखे दिग्गज मात्र अनसोल्ड राहिले. आयपीएलच्या 10 संघांनी आज 72 खेळाडू खरेदी केले. यामध्ये 30 खेळाडू विदेशी आहेत. दहा संघांनी 72 खेळाडूंवर 230 कोटी रुपये खर्च केले. कोलकाता संघाने आजचा आणि आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू खरेदी केला.
Chennai Super Kings Retained Players: चेन्नईच्या ताफत कोण कोण?
अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे
Chennai Super KingsRetained Players: Ajay Mandal, Ajinkya Rahane, Deepak Chahar, Devon Conway, Maheesh Theekshana, Matheesha Pathirana, Mitchell Santner, Moeen Ali, MS Dhoni, Mukesh Choudhary, Nishant Sindhu, Prashant Solanki, Rajvardhan Hangargekar, Ravindra Jadeja, Ruturaj Gaikwad, Shaik Rasheed, Shivam Dube, Simarjeet Singh, Tushar Deshpande
चेन्नईने आज कुणाला घेतले?
डॅरेल मिचेल Daryl Mitchell (14 कोटी)
समीर रिझवी Sameer Rizvi ( 8.4 कोटी )
शार्दूल ठाकूर Shardul Thakur (4 कोटी)
मुस्तफिजुर रहमान Mustafizur Rahman (2 कोटी)
रचिन रविंद्र Rachin Ravindra (1.80 कोटी)
अविनाश रॉय Avanish Rao Aravelly (20 Lakh)
The MS Dhoni army is ready...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 19, 2023
- Chepauk cannot wait for their Thala! pic.twitter.com/N6Z07XmAqT