IND Vs WI: मैदानातच रोहित शर्मा युजवेंद्र चहलवर भडकला, नेमकं काय घडलं?
IND Vs WI: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला 44 धावांनी पराभूत करून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलीय.
IND Vs WI: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला 44 धावांनी पराभूत (India Beat West Indies) करून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलीय. भारताच्या विजयात सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि केएल राहुल (KL Rahul) यांचा मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र, या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल माडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. ज्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फिरकीपटू युजवेंद्र चहलवर (Yuzvendra Chahal) चांगलाच भडकल्याचं दिसत आहे. परंतु, मैदानात असं काय घडलं? ज्यामुळं रोहित शर्मा युजवेंद्र चहलवर भडकला? असा प्रश्न अनेकांना पडलाय.
वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत क्षेत्ररक्षण करत असताना 45 व्या षटकात रोहित शर्मा युजवेंद्र चहलवर भडकला आहे. ''क्या हुआ तेरे को, भाग क्यों नहीं रहा है ठीक से? चल उधर भाग'', असा रोहित शर्मा चहलला बोलत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रोहितच्या या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
पी कृष्णाची उत्कृष्ट गोलंदाजी
वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं नाणेफेक गमावलं. त्यानंतर प्रथम फलंदाजी करत भारतानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 238 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून सुर्यकुमार यादवनं सर्वाधिक 64 धावा आणि केएल राहुलनं 49 धावां केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 193 धावांवर आटोपला. भारताकडून पी. कृष्णानं उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकात केवळ 12 धावा दिल्या. याशिवाय, शार्दुल ठाकूरनंही दोन विकेट्स मिळवल्या.
हे देखील वाचा-
- आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या पॅरा बॅडमिंटनपटूची उपेक्षा; नांदेडच्या खेळाडूला आर्थिक मदतीची गरज
- आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या पॅरा बॅडमिंटनपटूची उपेक्षा; नांदेडच्या खेळाडूला आर्थिक मदतीची गरज
- IND Vs WI, 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 44 धावांनी विजयी, मालिकेतही विजयी आघाडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha