IPL Auction 2022 LIVE: आयपीएल मेगा ऑक्शन 2022 लाईव्ह कधी, कुठे आणि कसं पाहायचं?
IPL Auction 2022 LIVE: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या मेगा ऑक्शनची अनेकांना उस्तुकता लागली आहे.
IPL Auction 2022 LIVE: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या मेगा ऑक्शनची अनेकांना उस्तुकता लागली आहे. येत्या 12- 13 फेब्रुवारीदरम्यान आयपीएलचं मेगा ऑक्शनचा कार्यक्रम पार पडणार आहे. आयपीएल 2022 मध्ये दोन नव्या संघाचा समावेश झाल्यानं यंदाचं हंगाम आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. आयपीएलचं मेगा ऑक्शन लाईव्ह कधी, कुठे आणि कसं पाहायचं? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आयपीएलच्या या मेगा लिलावात उपलब्ध 590 खेळाडूंपैकी सर्वोत्तम पर्यायांना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा प्रत्येक फ्रँचाईझीचा प्रयत्न असेल. त्या 590 खेळाडूंमध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावात दहा फ्रँचाईझींकडून आपल्या पसंतीच्या शिलेदारावर दौलतजादा करण्यात येईल. आणि तोच असणार आहे आयपीएलचा मेगा लिलाव. या लिलावासाठी प्रत्येक फ्रँचाईझीच्या हाताशी त्यांच्या बटव्यात विशिष्ट रक्कम आहे.
आयपीएलचं मेगा ऑक्शन कधी, कुठे पाहायचं?
आयपीएलचं मेगा ऑक्शनचा कार्यक्रम येत्या 12-13 फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू येथे पार पडणार आहे. सकाळी 12 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. स्टार नेटवर्कवर आयपीएलचं मेगा ऑक्शनचं प्रक्षेपण पाहता येणार आहे. तसेच आयपीएलच्या मेगा ऑक्शनचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिज्नी हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
कोणत्या फ्रँचाईझीच्या ताफ्यात कोणते शिलेदार? फ्रँचाईझींच्या बटव्यात किती रक्कम आणि किती खेळाडूंची गरज
चेन्नई सुपर किंग्स
बिनीचे शिलेदार – रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
दिल्ली कॅपिटल्स
बिनीचे शिलेदार– रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी) आणि एनरिच नॉकिया (6.5 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 47.5 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
कोलकाता नाईट रायडर्स
बिनीचे शिलेदार– आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 6
लखनौ सुपर जायंटस
बिनीचे शिलेदार– लोकेश राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉईनिस (9.2 कोटी), रवी बिष्णोई (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 59 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
मुंबई इंडियन्स
बिनीचे शिलेदार– रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरा (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
पंजाब किंग्स
बिनीचे शिलेदार– मयांक अगरवाल (12 कोटी), अर्शदीपसिंग (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 72 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 23, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 8
राजस्थान रॉयल्स
बिनीचे शिलेदार– संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी) यशस्वी जैस्वाल (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 62 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
बिनीचे शिलेदार– विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 57 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
सनरायझर्स हैदराबाद
बिनीचे शिलेदार– केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 68 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
अहमदाबाद टायटन्स
बिनीचे शिलेदार– हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (आठ कोटी)
बटव्यातली शिल्लक – 52 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
हे देखील वाचा-
- IND Vs WI: मैदानातच रोहित शर्मा युजवेंद्र चहलवर भडकला, नेमकं काय घडलं?
- IND vs WI: भारताची ऐतिहासिक कामगिरी, सलग 11 एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजला चाखली धूळ
- आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या पॅरा बॅडमिंटनपटूची उपेक्षा; नांदेडच्या खेळाडूला आर्थिक मदतीची गरज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha