IPL 2021 Auction : पंजाब किंग्सकडे सर्वाधिक 53.20 कोटी रुपये, कोणता संघ किती खेळाडू खरेदी करणार?
IPL Auction 2021, Kings Punjab: आयपीएल 14 व्या मोसमापूर्वी होणाऱ्या या लिलावात पंजाब किंग्जकडे सर्वाधिक 53.20 कोटी रुपये आहेत. लिलावासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादकडे मात्र10..75 कोटी रुपये शिल्लक आहेत.
IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमासाठी आज 291 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. सर्व आठ संघांकडे 61 जागा रिक्त आहेत ज्या लिलावाने भरल्या जातील. 14 व्या मोसमापूर्वी होणाऱ्या या लिलावात पंजाब किंग्जकडे सर्वाधिक 53.20 कोटी रुपये आहेत. लिलावासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादकडे मात्र10..75 कोटी रुपये शिल्लक आहेत.
कोणत्या संघात किती जागा रिक्त?
पंजाब किंग्ज: गेल्या वर्षी आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीनंतर पंजाब किंग्जने मॅक्सवेलसह सात खेळाडूंना रिलीज केलं आहे. लिलावात पंजाब संघाकडे 53.30 कोटी रुपये आहेत. यासह, पंजाब संघ एकूण 9 खेळाडूंची खरेदी करू शकेल, ज्यात पाच परदेशी खेळाडूंचा समावेश असेल.
रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर: विराट कोहलीची टीमही या लिलावात काही बड्या खेळाडूंकडे लक्ष देणार आहे. आरसीबीने गेल्या वर्षी ख्रिस मॉरिसला संघातून रिलीज केलं होतं. आरसीबीकडे 35.90 कोटी रुपये आहेत. आरसीबी तीन विदेशी खेळाडूंसह 11 खेळांडूवर बोली लावू शकेल.
राजस्थान रॉयल्स: राजस्थान रॉयल्सने स्टिव्ह स्मिथसह आठ खेळाडूंना रिलीज केले आहे. राजस्थानकडे 34.85 कोटींची रक्कम आहे. राजस्थान रॉयल्स तीन परदेशी खेळाडूंसह 9 खेळाडू खरेदी करू शकेल.
IPL Auction 2021 | लिलावाला चला तुम्ही, आयपीएलच्या लिलावाला चला...
चेन्नई सुपर किंग्जः आज होणाऱ्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज भारतीय खेळाडूंवर लक्ष ठेवणार आहे. चेन्नईच्या टीमकडे 22.90 कोटी रुपये आहेत. आजच्या लिलावात चेन्नई पाच भारतीय आणि एक परदेशी खेळाडू खरेदी करू शकेल.
मुंबई इंडियन्सः आजच्या लिलावात मुंबई इंडियन्स कोणत्याही खेळाडूवर मोठा बोली लावणार नाही. आयपीएलचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडे 15.35 कोटी रुपये आहेत. लिलावात चार परदेशी खेळाडूंसह एकूण सात खेळाडू खरेदी करू शकेल.
दिल्ली कॅपिटल्स: दिल्ली कॅपिटल्स संघ लिलावात बॅकअप विकेटकीपर आणि सलामीवीर खेळाडूच्या शोधात असेल. लिलावापूर्वी जेसन रॉय आणि अॅलेक्स कॅरीसह एकूण सहा खेळाडूंना रिलीज करण्यात आलं आहे. दिल्लीकडे लिलावासाठी 12.90 कोटी रुपये असतील. तीन विदेशी खेळाडूंसह एकूण आठ खेळाडू खरेदी करू शकते.
IPL Auction 2021 live streaming | जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकाल आयपीएलचा लिलाव
कोलकात नाईट रायडर्स: आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने एकूण सहा खेळाडूंना रिलीज केलं आहे. लिलावात नवीन खेळाडू खरेदी करण्यासाठी आता कोलकाताकडे 10.75 कोटी रुपये आहेत. लिलावात कोलकाता दोन विदेशीसह एकूण आठ खेळाडू खरेदी करू शकतो.
सनरायझर्स हैदराबाद: सनरायझर्स हैदराबादने आगामी हंगामासाठी सर्वाधिक 22 खेळाडू कायम ठेवले आहेत. असे असूनही, लिलावात त्याच्याकडे 10.75 कोटी रुपये शिल्लक आहेत. हैदराबाद लिलावात एक विदेशी खेळाडूसह एकूण तीन खेळाडू खरेदी करता येतील.