IPL 2025: नाव मोठं पण.. आंतरराष्ट्रीय स्टार आयपीएलमध्ये चमकलेच नाहीत,रिषभ पंत ते शिवम दुबे,अनेकांकडून चाहत्यांचा अपेक्षाभंग
Players Bad Performance In IPL 2025: आयपीएलच्या 18 व्या हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे स्टार खेळाडू फेल ठरले आहेत. टीम आणि चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला.

International Cricketer In IPL 2025: आयपीएलचा 18 वा हंगाम काही खेळाडूंसाठी अविस्मरणीय ठरला. तर, काही खेळाडूंना 18 व्या हंगामात चांगली कामगिरी करता आली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं मैदान गाजवणारे स्टार खेळाडू अपयशी ठरले. यामध्ये रिषभ पंत, शिवम दुबे, मोहम्मद शमी आणि रिंकु सिंग, व्यंकटेश अय्यर या सारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant)
लखनौ सुपर जायंटसचा कॅप्टन रिषभ पंतला आयपीएलच्या 18 व्या हंगामात दमदार कामगिरी करता आली नाही. रिषभ पंतनं 14 मॅचमध्ये 24.45 च्या सरासरीनं 269 धावा केल्या. लखनौ सुपर जायंटसनं 27 कोटी रुपये मोजून त्याला खरेदी केलं होतं. रिषभ पंतला लखनौला प्लेऑफपर्यंत पोहोचता आलं नाही.
लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू लियाम लिविंगस्टोननं या हंगामात 10 मॅच खेळल्या आणि 16 च्या सरासरीनं केवळ 112 धावा केल्या. 10 मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या. आरसीबीनं 8.75 कोटी रुपये मोजले होते.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
ग्लेन मॅक्सवेलसाठी आयपीएलचा हा हंगाम निराशाजनक ठरला. दुखापतीमुळं तो आयपीएलबाहेर गेला, त्यानं पंजाब किंग्जकडून 7 मॅच खेळल्या. यात 8 च्या सरासरीनं केवळ 48 धावा केल्या आणि 4 विकेट घेतल्या.
व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)
व्यंकटेश अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सनं 23.75 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं याशिवाय उपकप्तान केलं होतं. या हंगामात त्यानं 11 मॅचमध्ये 20.29 च्या सरासरीनं 142 धावा केल्या. अय्यरनं केवळ एक अर्धशतक केलं. आयपीएलच्या या हंगामातील सर्वात तिसरा महागडा खेळाडू ठरला.
ईशान किशन (Ishan Kishan)
ईशान किशन या हंगामात सनरायजर्स हैदराबादकडून खेळत होता. ईशान किशनला 11.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. ईशाननं 14 मॅचमध्ये 354 धावा केल्या. त्यानं पहिल्या मॅचमध्ये एक शतक केलं. ईशान किशन या हंगामात फ्लॉप ठरला.
रियान पराग (Riyan Parag)
रियान परागला राजस्थान रॉयल्सनं 14 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्यान रियान परागला राजस्थानचं कर्णधार पद मिळालं होतं. रियान परागनं 14 मॅचमध्ये 32.75 च्या सरासरीनं 393 धावा केल्या.
रिंकू सिंह (Rinku Singh)
रिंकू सिंहला कोलकाता नाईट रायडर्सला 13 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. या हंगामात रिंक सिंह चांगली कामगिरी करु शकला नाही. 13 मॅचमध्ये त्यानं 206 धावा केल्या. यात एकही अर्धशतक केलं नाही.
मोहम्मद शमी (Mohammed Shami)
मोहम्मद शमी यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळत होता. त्यानं 9 मॅचमध्ये केवळ 6 विकेट घेतल्या. सनरायजर्स हैदराबादनं मोहम्मद शमीला 10 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.
फाफ डु प्लेसिस (Faf Du Plessis)
फाफ डु प्लेसिस या हंगामात दिल्ली कॅपिटल्स कडून खेळला आहे. फाफ डु प्लेसिसनं 9 मॅचमध्ये 22.44 च्यासरासरीनं 202 धावा केल्या. फाप डु प्लेसिसनं दिल्लीचं नेतृत्व देखील केलं. मात्र, दिल्ली प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही.
शिवम दुबे (Shivam Dube)
शिवम दुबे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता. सीएसकेनं त्यासाठी 12 कोटी रुपये मोजले होते. शिवम दुबेनं 14 मॅचमध्ये 357 धावा केल्या, त्यानं 32.45 च्या सरासरीनं धावा केल्या.





















