(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2025 : काव्या मारन अन् नीता अंबानींनी रिटेन्शनलाच पेटारा उघडला, पर्समध्ये राहिले 45 कोटी, ऑक्शनसाठी कुणाकडे किती कोटी बाकी?
IPL 2025 Remaining Purse Mega Auction : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. सर्व 10 फ्रँचायझींनी एकूण 47 खेळाडूंना कायम ठेवले आहे.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. सर्व 10 फ्रँचायझींनी एकूण 47 खेळाडूंना कायम ठेवले आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्रत्येकी सर्वाधिक 6 खेळाडू राखले तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी 5 खेळाडू कायम ठेवले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तीन तर पंजाब किंग्जने दोन खेळाडूंना कायम ठेवले. सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आणि प्रत्येक संघाच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक आहेत ते जाणून घेऊया...
मुंबई इंडियन्स
रिटेन केलेले खेळाडू : जसप्रीत बुमराह (18 कोटी), सूर्यकुमार यादव (16.35 कोटी), हार्दिक पंड्या (16.35 कोटी), रोहित शर्मा (16.30 कोटी), तिलक वर्मा (8 कोटी)
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे : 45 कोटी (120 कोटींपैकी)
सनरायझर्स हैदराबाद
कायम ठेवलेले खेळाडू : हेनरिक क्लासेन (23 कोटी), पॅट कमिन्स (18 कोटी), अभिषेक शर्मा (14 कोटी), ट्रॅव्हिस हेड (14 कोटी), नितीश कुमार रेड्डी (6 कोटी)
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे : 45 कोटी रुपये (120 कोटींपैकी)
लखनऊ सुपर जायंट्स
रिटेन केलेले खेळाडू : निकोलस पूरन (21 कोटी), रवी बिश्नोई (11 कोटी), मयंक यादव (11 कोटी), मोहसिन खान (4 कोटी), आयुष बडोनी (4 कोटी)
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे : 69 कोटी रुपये (120 कोटींपैकी)
पंजाब किंग्स
रिटेन केलेले खेळाडू : शशांक सिंग (5.5 कोटी), प्रभसिमरन सिंग (4 कोटी)
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे : रु. 110.5 कोटी (120 कोटींपैकी)
राजस्थान रॉयल्स
रिटेन केलेले खेळाडू : संजू सॅमसन (18 कोटी), यशस्वी जैस्वाल (18 कोटी), रियान पराग (14 कोटी), ध्रुव जुरेल (14 कोटी), शिमरॉन हेटमायर (11 कोटी), संदीप शर्मा (4 कोटी) रु.)
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे : 41 कोटी रुपये (120 कोटींपैकी)
चेन्नई सुपर किंग्ज
रिटेन केलेले खेळाडू : ऋतुराज गायकवाड (18 कोटी), मथिशा पाथिराना (13 कोटी), शिवम दुबे (12 कोटी), रवींद्र जडेजा (18 कोटी), एमएस धोनी (4 कोटी)
लिलावासाठी पर्समध्ये पैसे शिल्लक आहेत : 65 कोटी (120 कोटींपैकी)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
रिटेन केलेले खेळाडू : विराट कोहली (21 कोटी), रजत पाटीदार (11 कोटी), यश दयाल (5 कोटी)
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे : 83 कोटी (120 कोटींपैकी)
कोलकाता नाईट रायडर्स
रिटेन केलेले खेळाडू : रिंकू सिंग (13 कोटी), वरुण चक्रवर्ती (12 कोटी), सुनील नरेन (12 कोटी), आंद्रे रसेल (12 कोटी), हर्षित राणा (4 कोटी), रमणदीप सिंग (4 कोटी रु)
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे : रु 51 कोटी (120 कोटींपैकी)
दिल्ली कॅपिटल्स
रिटेन केलेले खेळाडू : अक्षर पटेल (16.50 कोटी), कुलदीप यादव (13.25 कोटी), ट्रिस्टन स्टब्स (10 कोटी), अभिषेक पोरेल (4 कोटी)
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे : रु 73 कोटी (120 कोटींपैकी)
गुजरात टायटन्स
रिटेन केलेले खेळाडू : राशिद खान (रु. 18 कोटी), शुभमन गिल (16.50 कोटी), साई सुदर्शन (8.50 कोटी), राहुल तेवतिया (4 कोटी), शाहरुख खान (4 कोटी)
लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे : 69 कोटी रुपये (120 कोटींपैकी)