IPL 2025 : संयमी फलंदाजी, स्पिनर्सचा खुबीने वापर अन् अप्रतिम कॅच; विराटच्या बंगळुरूच्या विजयाची पाच मोठी कारणे
RCB Won IPL 2025 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बंगळुरुनं पंजाबचा 6 धावांनी पराभव केला आणि विराट कोहलीचे 18 वर्षांचे स्वप्न सत्यात उतरलं.

मुंबई : आयपीएलच्या 18 व्या सिझनमध्ये इतिहास रचला असून विराट कोहलीच्या आरसीबीने पंजाबचा 6 धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉपी उंचावली. दोन्हीही संघांसाठी पहिल्यांदाच आयपीएल जिंकण्याची संधी होती. ही संधी आरसीबीने सांधली आणि विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण झालं. चांगली फलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, गोलंदाजांचा खुबीने वापर अशा अनेक कारणांमुळे बंगळुरूने हा विजय साध्य केला.
Reasons RCB Won IPL 2025 Final : बंगळुरूच्या विजयाची कारणे
1. आरसीबीची संयमी फलंदाजी
पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगळुरूने सुरुवातीपासूनच संयमी फलंदाजी करत धावांमध्ये सातत्य ठेवलं. सुरुवातापासून सरासरी 10 धावांची सरासरी फक्त 20 व्या षटकात कमी आली. 20 व्या षटकात केवळ तीन धावा मिळाल्याने बंगळुरूला 190 धावा करता आल्या. तरीही त्या धावा आव्हानात्मक होत्या.
2. श्रेयस अय्यर स्वस्तात गेला
मुंबई इंडियन्सविरोधात हिरो ठरलेला पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यरवर बंगळुरूविरोधात मोठी मदार होती. त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. तो मैदानात आलाही विजयाच्या आवेशानेच. पण शेफर्डने त्याला केवल एका धावावर बाद केलं. परिणामी पंजाबचा विश्वास डळमळीत झाल्याचं दिसून आला.
3. स्पिनर्सचा कुशालीने वापर
पंजाबचे फलंदाज धावांचा पाठलाग करताना सहजपणे चेंडू सीमारेषेपलिकडे पटकावत असताना रजत पाटीदारने स्पिनर्सचा वापर खुबीने वापर केल्याचं दिसून आलं. कुणाल पांड्याने पंजाबच्या धावसंख्येला नियंत्रण लावले. त्याने दोन बळीही घेतले.
4. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण
बंगळुरूच्या विजयाचे सर्वात मोठे कारण ठरले ते त्यांचे क्षेत्ररक्षण. सुरुवातीला शेफर्डने एक कॅच सोडला. पण त्यानंतर पंजाबच्या प्रियांश आर्याचा जबरदस्त कॅच फिल सॉल्टने पकडला. त्यानंतर आरसीबीने सातत्याने चांगली फलंदाजी करत विजय समीप आणला.
5. रजत पाटीदारची कॅप्टनशीप
बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने अंतिम सामन्यात जी कॅप्टनशीप दाखवली त्याला तोडच नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेत त्याने विजय निश्चित केला. बंगळुरूच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी केली. नंतर गोलंदाजांनी सातत्याने बळी पटकावले. सोबत अप्रतिम क्षेत्ररक्षणाची जोड मिळाली. या सांघिक कामगिरीचा परिणाम हा बंगळुरूच्या विजयात रुपांतरित झाल्याचं दिसून आला.
विराटची स्वप्नपूर्ती अन् बंगळुरूचा विजय
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाबचा पराभव करुन पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावलंय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बंगळुरुनं पंजाबचा 6 धावांनी पराभव केला. बंगळुरुनं दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 185 धावांचीच मजल मारता आली.
या विजयासह बंगळुरुचं आणि या संघाचा गेली 18 वर्ष भाग असणाऱ्या विराट कोहलीचं स्वप्न साकार झालं. कृणाल पंड्याने 4 षटकांत अवघ्या 17 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. तर, रोमारियो शेफर्डने श्रेयस अय्यरला तंबूचा रस्ता दाखवला. त्याआधी कोहलीच्या 35 चेंडूंमधील 43 तर रजत पाटीदारच्या 16 चेंडूंमधील 26 धावांच्या खेळींनी आरसीबीच्या 190 च्या धावसंख्येत महत्त्वाचं योगदान दिलं.
ही बातमी वाचा:




















