एक्स्प्लोर

IPL Hardik Pandya: हार्दिक पांड्याने शुद्ध मूर्खपणा केला, तिलक वर्माच्या रिटायर्ड आउटवरुन सुनील गावस्कर संतापले

IPL 2025 MI Vs LSG: मुंबईला लखनऊविरुद्धच्या सामन्यात 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. हार्दिक पांड्याने तिलक वर्माला मैदानातून बाहेर पाठवल्याचा निर्णय अनेकांना रुचला नव्हता.

IPL 2025 MI vs LSG: आयपीएल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंटसने (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात लखनऊने मुंबईचा 12 धावांनी पराभव केला. मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) जबाबदार धरण्यात येत आहे. तर काहीजण तिलक वर्माला (Tilak Verma) जबाबदार धरत आहेत. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध तिलक वर्माने अत्यंत संथ फलंदाजी केली. त्यामुळे हार्दिक पांड्या याने तिलक वर्मा याला परत बोलावून घेतले आणि त्याच्या जागी सँटनरला फलंदाजीसाठी मैदानात आणले. या निर्णयावरुन भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी संताप व्यक्त केला आहे. 

हार्दिक पंड्याने लखनौच्या सामन्यात जो प्रकार केला, त्याला मुर्खपणा सोडून दुसरे काहीही म्हणता येणार नाही. कारण हार्दिक पंड्याने तिलक वर्मासारख्या सेट झालेल्या फलंदजाना निवृत्त केले. पण त्याच्या जागी मिचेल सँटवरला आणले. जर तुलाही धावा घेत येत नव्हत्या, तर तिलक वर्माला प्रथम निवृत्त का केले? तो मूर्खपणा करण्यापूर्वी तू स्वत: देखील निवृत्त व्हायला हवे होते. या गोष्टीला मुर्खपणा सोडून असून दुसरं काहीच नाव देता येणार नाही, अशा शब्दांत गावस्कर यांनी हार्दिक पांड्याचे कान टोचले.

पहिली गोष्ट म्हणजे हार्दिकने तिलकला निवृत्त करत मिचेल सँटनरला फलंदाजीला आणले. तिलक हा चांगला सेट झाला होता आणि अखेरच्या षटकात तो मोठी फटकेबाजी करू शकला असता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हार्दिक पंड्यालाही यावेळी काही मोठे फटके मारता येत नव्हते. त्यामुळे तिलकला निवृत्त करण्यापेक्षा तो कर्णधार या नात्याने जबाबदारी स्विकारुन प्रथम निवृत्त व्हायला हवे होते. त्यामुळे हार्दिकने केलेल्या या गोष्टीला मुर्खपणाच म्हणता येईल, असे गावस्कर यांनी म्हटले.

हार्दिकचा अतिआत्मविश्वास संघाला घेऊन बुडाला

मुंबई इंडियन्सला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 29 धावा करायच्या होत्या. त्यावेळी हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा मैदानात होते. त्यामुळे 29 धावांचे हे लक्ष्य गाठणे पूर्णपणे शक्य वाटत होते नव्हते. पण 19 व्या षटकात शार्दुल ठाकूरने एलएसजीसाठी सामना फिरवला. या षटकात त्याने फक्त 7 धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात आवेश खानला 21 धावा वाचवायच्या होत्या. तिलक वर्माने 23 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर संघाने त्याला रिटायर्ड आउट केले. 19 व्या षटकात तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाला. तिलक वर्माच्या जागी आलेल्या मिचेल सँटनरला दोन चेंडूत फक्त दोन धावा करता आल्या. तिलक वर्माला माघारी बोलावण्याचा निर्णय अनेकांना रुचला नाही. हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला, पण पुढच्याच चेंडूंवर त्याने जोरदार पुनरागमन केले आणि लखनौचा 12 धावांनी विजय निश्चित केला.

आणखी वाचा

तिलक वर्मा प्रकरणात कोण खरं अन् कोण खोटं? हार्दिक पांड्या- जयवर्धनेच्या दाव्यांचा मेळ बसेना, सूर्यकुमारला बसला शॉक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget