एक्स्प्लोर

IPL 2024 : आरसीबीच्या स्वप्नांवर पाणी फेरणाऱ्या व्यंकटेश अय्यरचा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात लांब सिक्स,बॉल थेट स्टेडियम बाहेर

RCB vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅच काल चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडली. कोलकातानं आरसीबीवर दणदणीत विजय मिळवला.

बंगळुरु : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) सलग दुसरा विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) पराभवाचा धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) आरसीबीवर आणखी एक विजय मिळवला आहे. याशिवाय यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या नऊ मॅचेस या ज्या टीमच्या होम ग्राऊंडवर मॅच आहेत जिंकल्या होत्या. कोलकातानं हा ट्रेंड मोडून काढत विजयावर नाव कोरलं. कोलकाताच्या विजयाचा पाया व्यंकटेश अय्यर या खेळाडूनं रचला त्यानं 30 बॉलमध्ये 50 धावा केल्या.

कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज व्यंकटेश अय्यरनं (Venkatesh Iyer) आणि इतर फलदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळं विजय सोपा झाला. बंगळुरुचं एम. चिन्नास्वामी स्टेडियम फलंदाजीसाठी सोपं समजलं जातं. आयपीएलमध्ये या मैदानावर चौकार षटकारांची आतिषबाजी पाहयाला मिळते. 2024 च्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त चौकार षटकार  पाहायला मिळाले आहेत. 

व्यंकटेश अय्यरचा सर्वात लांब षटकार

केकेआरचा फलंदाज व्यंकटेश अय्यर यानं आरसीबी विरोधात अर्धशतक झळकावलं.व्यंकटेश अय्यरनं 30 बॉलमध्ये 50 धावा केल्या. त्यामध्ये 4 चौकार आणि तीन षटकार मारले. 

मुंबईच्या ईशान किशननं नुकत्याच झालेल्या सनरायजर्स हैदराबाद विरोधातील मॅचमध्ये 103 मीटरचा सिक्स मारला होता. कालच्या मॅचमध्ये व्यंकटेश अय्यरनं मॅचमधील 9 व्या ओव्हरमध्ये मयंक डागरला 106  मीटर लांब सिक्स मारला. व्यंकटेश अय्यरनं जोरदार फटका मारत मिडविकेटच्या वरुन बॉल स्टेडियमच्या बाहेर पाठवला.  

व्यंकटेश अय्यर फिलीप सॉल्ट बाद झाल्यानंतर मैदानावर बॅटिंगसाठी उतरला होता. फिलीप सॉल्टनं 30 धावा केल्या होत्या. यानंतर मैदानात आलेल्या व्यंकटेश अय्यरनं कोलकाताचा डाव सावरला.व्यंकटेशनं अय्यरनं 30 बॉलमध्ये 50  धावांची खेळी केली. अल्जारी जोसेफला त्यानं एकाच ओव्हरमध्ये दोन षटकार आणि दोन चौकार मारले. 

केकेआरचा दणदणीत विजय

कोलकाता नाईट रायडर्सनं या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 182 धावा केल्या होत्या. विराट कोहलीनं 83 धावा केल्यानं आरसीबीला ही धावसंख्या उभारता आली. व्यंकटेश अय्यर 50, सुनील नरेन 47, फिलीप सॉल्ट 30 आणि  श्रेयस अय्यरच्या नाबाद 39 धावांच्या जोरावर केकेआरनं दणदणीत विजय मिळवला.  

केकेआर दुसऱ्या स्थानी 

कोलकाता नाईट रायडर्सनं सलग दुसरा विजय मिळवल्यानं गुणतालिकेतदेखील बदल झाले आहेत. केकेआरनं 19 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवला त्यामुळं राजस्थान रॉयल्स प्रमाणं 4 गुण असले तरी नेट रनरेटच्या जोरावर त्यांनी दुसरं स्थान पटकावलं.

संबंधित बातम्या : 

केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table

RCB Vs KKR: कोहलीची खेळी व्यर्थ ठरली; केकेआरचा आरसीबीवर विजय, आयपीएलचं आज 'खास' गणितही मोडलं!

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget