IPL 2024: केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table
IPL 2024 Latest Points Table: केकेआरच्या आजच्या विजयामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे.
IPL 2024 Latest Points Table: आयपीएल 2024 च्या 10 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला आहे. विराट कोहलीच्या नाबाद 83 धावांच्या खेळीमुळे आरसीबीने 20 षटकांत 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने 16.5 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. केकेआरच्या आजच्या विजयामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे.
आरसीबीविरुद्धच्या सहज विजयासह केकेआर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. तर आरसीबी सहाव्या स्थानावर कायम आहे. आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 3 सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने सलग दुसरा सामना जिंकून 2 गुण जमा केले आणि आता 2 सामन्यात 2 विजयांसह त्यांचे एकूण 4 गुण झाले आहेत. यासह, संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान काबीज केले आहे आणि त्यांचा नेट रनरेट +1.047 झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज अजूनही अव्वल स्थानावर आहे, त्यांचे आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकून त्यांचे 4 गुण आहेत. परंतु +1.979 च्या चांगल्या नेट रनरेटमुळे, चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे पाहिले तर 3 सामन्यांत 1 विजयानंतर त्यांचे 2 गुण आहेत आणि संघ -0.711 च्या नेट रनरेटमुळे सहाव्या स्थानावर आहे. केकेआर चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचल्याने राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादची प्रत्येकी एक स्थान घसरून तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आली आहे. राजस्थान आणि हैदकाबादचे सध्या अनुक्रमे 4 आणि 2 गुण आहेत. पाचव्या स्थानावर पंजाब किंग्ज आहे, ज्यांचे सध्या 2 सामन्यात 1 विजयानंतर 2 गुण आहेत. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 2 सामन्यांत एक विजय नोंदवला आहे, त्यामुळे ते सध्या सातव्या क्रमांकावर आहेत.
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएल 2024 मध्ये त्यांचे दोन्ही सामने गमावले आहेत, त्यामुळे त्यांचे खाते अद्याप गुणतालिकेत उघडलेले नाही. दिल्ली आणि मुंबई सध्या नेट रन-रेटच्या आधारावर अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत एक सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे. सध्या केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
केकेआरच्या आजच्या विजयामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. आरसीबीविरुद्धच्या सहज विजयासह केकेआर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. #KKRvsRCB pic.twitter.com/rQpgwzXqMB
— ABP माझा (@abpmajhatv) March 29, 2024
संबंधित बातम्या-
कोहली अन् गंभीर आज पुन्हा आमने-सामने; पण यंदा भलतंच घडलं, चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का, Video
विराट कोहली अन् गौतम गंभीरची भर मैदानात गळाभेट; रवी शास्त्री अन् सुनील गावसकरांची मजेशीर कमेंट
RCB Vs KKR: कोहलीची खेळी व्यर्थ ठरली; केकेआरचा आरसीबीवर विजय, आयपीएलचं आज 'खास' गणितही मोडलं!