(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 SRH vs GT: सामना पावसामुळे रद्द, पण गळाभेटीची रंगली चर्चा; काव्या मारनने केन विलियम्सनला मारली मिठी, Video
IPL 2024 SRH vs GT: सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि गुजरात टायटन्स (GT) यांचा सामना रद्द झाल्यानंतर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
IPL 2024 SRH vs GT: सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि गुजरात टायटन्स (GT) यांचा काल होणारा सामना रद्द झाला. सातत्याने पडत राहिलेल्या पावसामुळे मैदान खेळण्यायोग्य न राहिल्याने सदर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे हैदराबाद आणि गुजरातला एक-एक गुण देण्यात आले. या गुणासह हैदराबादने 15 गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावत प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले.
हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द झाल्यानंतर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) आणि गुजरातचा खेळाडू आणि हैदराबादचं कर्णधारपद सांभाळलेल्या केन विल्यमसन यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. केन विल्यमसनला यंदाच्या हंगामात जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र आगामी टी-20 विश्वचषकात केन विल्यमसन न्यूझीलंड संघाचा कर्णधारपद सांभळणार आहे.
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 16, 2024
काव्या मारन या सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. सनराइजर्स हैदराबाद टीमची मालकी सन ग्रुपकडे आहे. काव्या पहिल्यांदा 2018 मध्ये सनराइजर्स हैदराबाद टीमला चिअर करण्यासाठी स्टेडिअमला आली होती. काव्या सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट Sun NXT ची प्रमुख आहे. काव्याला क्रिकेट खूप आवडतं.
कोण आहे काव्या मारन?
काव्या मारनचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये झाला. 33 वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. काव्याची एकूण संपत्ती 409 कोटी रुपये आहे. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते.
हैदराबादचा प्ले ऑफमध्ये प्रवेश -
सनरायजर्स हैदराबादचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. हैदराबाद आणि गुजरात संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला. हैदराबादचे 13 सामन्यात आता सात विजयासह 15 गुण झाले आहेत. 15 गुणांसह हैदराबादच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केलाय. हैदराबादचा अखेरचा सामना पंजाबविरोधात होणार आहे. हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये पोहचणारा तिसरा संघ ठरला आहे. याआधी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. चौथा संघ कोणता असेल, याकडे आता नजरा लागल्या आहेत. आता चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्याकडे चाहत्यांच्या नजरा असतील. या दोन्हीतील एक संघ प्लेऑपमध्ये दाखल होणार आहे.