(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 CSK vs RCB: IPL मधील सर्वात मोठी लढत; पण कोहली अन् धोनी फलंदाजी सोडून काय करत बसले?, फोटो व्हायरल
IPL 2024 CSK vs RCB: आता प्ले ऑफसाठी एक जागा शिल्लक आहे आणि शर्यतीत दोन संघ आहेत. आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील एक संघ प्ले ऑफमध्ये दाखल होणार आहे.
IPL 2024 CSK vs RCB: सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि गुजरात टायटन्स (GT) यांचा काल होणारा सामना रद्द झाला. सातत्याने पडत राहिलेल्या पावसामुळे मैदान खेळण्यायोग्य न राहिल्याने सदर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे हैदराबाद आणि गुजरातला एक-एक गुण देण्यात आले. या गुणासह हैदराबादने 15 गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावत प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले.
हैदराबाद आणि गुजरात यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. पण याचा फटका पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना बसला आहे. हे दोन्ही संघ आता स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. त्यांच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. हैदराबादचा दोन्ही सामन्यात दारुण पराभव झाला असता, तर दिल्ली आणि पंबाज या संघाना प्ले ऑफच्या आशा होत्या. पण सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे या दिल्ली आणि लखनौचं आव्हान संपुष्टात आलेय. याआधी मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि गुजरात यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.
पाच संघाचे प्ले ऑफचं आव्हान संपुष्टात आले आहे. तीन संघाचं प्लेऑफमधील स्थान निश्चित झालं आहे. आता प्ले ऑफसाठी एक जागा शिल्लक आहे आणि शर्यतीत दोन संघ आहेत. आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील एक संघ प्ले ऑफमध्ये दाखल होणार आहे. चेन्नई आणि आरसीबीचा सामना उद्या बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे. दोन्ही संघ आयपीएलमधील अंतिम सामना असल्यासारखी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. चेन्नई आणि आरसीबीच्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू तयारी करताना दिसत आहे. याचदरम्यान चेन्नईचा एमएस धोनी (MS Dhoni) आणि आरसीबीच्या विराट कोहलीने (Virat Kohli) काल गोलंदाजी टाकण्याचा सराव केला. धोनी आणि कोहली या सामन्यासाठी विशेष तयारी करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या सामन्यात बाजी मारत प्ले ऑफमध्ये कोण दाखल होणार, हे उद्याचं स्पष्ट होणार आहे.
KOHLI 🤝 DHONI.
— Johns. (@CricCrazyJohns) May 16, 2024
- Both were bowling in nets in Chinnaswamy. pic.twitter.com/vfJIorYUam
चेन्नई बाजी मारणार-
अनेक माजी खेळाडूंनी प्ले ऑफच्या फेरीत कोणते 4 संघ असतील, याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी बंगळुरु आणि चेन्नईच्या सामन्यात चेन्नई विजयी होईल, आणि बंगळुरु प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. इरफान पठाण, अंबाती रायडू, मोहम्मद कैफ, मैथ्यू हेडन आणि टॉम मूडी यांनी बंगळुरुला साथ न देता चेन्नईला साथ दिली आहे.
प्ले ऑफच्या फेरीसाठी बंगळुरुचं समीकरण कसं असेल?
आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. 18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुमध्ये त्यांचा सामना होणार आहे. चेन्नईने आरसीबीचा पराभव केला, तर ते थेट पात्र ठरणार आहेत. पण आरसीबीचा संघ मात्र समिकरणात अडकलाय. चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबादच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. जर हैदराबादचा उर्वरित दोन्ही सामन्यात दारुण पराभव झाला तर आरसीबी आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात.
संबंधित बातम्या:
IPL 2024 RCB: रशियन मुलीही RCB च्या प्रेमात, विराट कोहलीची टीमच IPL जिंकण्याचा विश्वास, पाहा Video