PBKS vs RR : पंजाबच्या बॅटिंगला राजस्थानच्या बॉलर्सनी सुरुंग लावला, सॅमसनचं प्लॅनिंग सक्सेसफुल, किंग्जला किती धावांवर रोखलं?
PBKS vs RR : आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच होत आहे. राजस्थाननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.
![PBKS vs RR : पंजाबच्या बॅटिंगला राजस्थानच्या बॉलर्सनी सुरुंग लावला, सॅमसनचं प्लॅनिंग सक्सेसफुल, किंग्जला किती धावांवर रोखलं? ipl 2024 rr vs pbks punjab kings made score 147 runs against rajasthan royals PBKS vs RR : पंजाबच्या बॅटिंगला राजस्थानच्या बॉलर्सनी सुरुंग लावला, सॅमसनचं प्लॅनिंग सक्सेसफुल, किंग्जला किती धावांवर रोखलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/038811421294bc92e0caac0a75fd10891713022198725989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंदीगड: आयपीएलमध्ये (IPL 2024) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात मॅच सुरु आहे. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सिंगनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या गोलंदाजांनी आपल्या कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवत पंजाबला नियमित अंतरानं धक्के दिले. लियाम लिव्हिंगस्टोन आणि आशुतोष शर्मानं डावाच्या अखेरीस केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबनं 20 ओव्हर्समध्ये 8 विकेटवर 147 धावा केल्या. राजस्थानला विजयासाठी आता 148 धावांची गरज आहे.
पंजाब किंग्जनं डावाची सुरुवात सावधपणे केली मात्र त्यांचे सलामीवर मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. अथर्व तायडे आणि जॉनी बेयरस्टो 15 -15 धावा करुन बाद झाले. कॅप्टन शिखर धवन दुखापतीमुळं उपस्थित नसल्यानं संघाचं नेतृत्त्व सॅम करनकडे देण्यात आलं होतं. प्रभासिमरन सिंग देखील चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यानं केवळ 10 धावा केल्या.
पंजाबच्या टीमचा आजचा कॅप्टन सॅम करन देखील केवळ 6 धावा करुन बाद झाला. यानंतर पंजाबच्या आशा शशांक सिंगवर होत्या. शशांक सिंगनं यापूर्वीच्या दोन मॅचमध्ये चांगली खेळी केली होती.मात्र, त्याला आजच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. तो केवळ 9 धावा करुन बाद झाला.
पंजाब किंग्जचा विकेट कीपर जितेश शर्मानं 29 धावा केल्या. त्यानं दोन षटकार मारले. यामुळं पंजाबनं शंभर धावांचा टप्पा पार केला.
दुखापतीनंतर संघात परतलेल्या लियाम लिविंगस्टोनननं पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणं कामगिरी केली नाही. लियाम लिविंगस्टोन 21 धावांवर बाद झाला.
आशुतोष शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात स्थान देण्यात आलं. आशुतोष शर्माचा कॅच संजू सॅमसन आणि आवेश खान यांच्या दोघांकडून सुटला. यानंतर आशुतोष शर्मानं फटकेबाजी केली. आशुतोष शर्मानं 31 धावांची खेळी केली.
राजस्थानचे बॉलर्स ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, आवेश खान, युजवेंद्र चहल आणि केशव महाराज यांनी टिच्चून बॉलिंग केली. आवेश खान, केशव महाराजनं दोन दोन विकेट घेतल्या. तर, कुलदीप सेन आणि चहलला एक विकेट मिळाली.
राजस्थान विजयाच्या मार्गावर परतणार?
राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये अखेरच्या बॉलवर पराभव स्वीकारावा लागला होता. राजस्थानचा आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत पहिलं स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत पंजाबला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. आता राजस्थानचे फलंदाज त्यांची कामगिरी पार पाडतात का हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)