6,6,6,6,6,6, एका ओव्हरमध्ये सहा षटकारांचा पाऊस, युवराज सिंगच्या क्लबमध्ये युवा खेळाडूची एंट्री, पाहा व्हिडीओ
Dipendra Singh Airee : टी-20 क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्याचा विक्रम आतापर्यंत दोन खेळाडूंच्या नावावर होता. त्यामध्ये तिसऱ्या खेळाडूची एंट्री झाली आहे.
नवी दिल्ली : नेपाळच्या क्रिकेट टीमचा मधल्या फळीतील फलंदाज दिपेंद्र सिंग एरी (Dipendra Singh Airee) यानं शनिवारी इतिहास रचला. युवराज सिंग, (Yuraj Singh) केरॉन पोलार्ड यांनी जो विक्रम रचला होता त्या विक्रमाची बरोबरी दिपेंद्र सिंग एरीनं केली. टी-20 क्रिकेटमध्ये (T 20 Cricket) एका ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स मारणारा दिपेंद्र सिंग हा तिसरा खेळाडू ठरला आहे.
नेपाळचा फलंदाज दिपेंद्र सिंह एरीनं ही दुर्मिळ कामगिरी एसीसी प्रीमियर कपच्या ग्रुप एच्या मॅचमध्ये केली.एआय अमिरात मध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत त्यानं कतार विरोधात त्यानं सलग सहा सिक्स मारले. नेपाळ आणि कतार यांच्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये दिपेंद्र सिंह एरीनं सलग सहा सिक्स मारले. यामुळं नेपाळच्या संघानं 20 ओव्हर्समध्ये 7 विकेटवर 210 धावा केल्या.
युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी
नेपाळच्या दिपेंद्र सिंग एरीनं एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारुन भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू केरॉन पोलार्डची बरोबरी केली आहे. दिपेंद्र सिंह एरी अशी कामगिरी करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.
दिपेंद्र सिंह एरी यानं त्याच्या कारकिर्दीत 60 टी -20 मॅच खेळल्या आहेत. कतार विरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले. कतारचा गोलंदाज कामरान खान याला त्यानं सहा सिक्स मारले.
कामरान खानच्या ओव्हरपूर्वी दिपेंद्र सिंह एरी याच्या 15 बॉलमध्ये 28 धावा झाल्या होत्या. अखेरच्या ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स मारल्यानंतर त्याच्या 21 बॉलमध्ये 64 धवा झाल्या. दिपेंद्र सिंह एरीनं त्याच्या डावात 7 सिक्स मारले.
𝗨𝗡𝗥𝗘𝗔𝗟 😵💫#NEPvQAT #ACCMensPremierCup #ACC pic.twitter.com/72Itd5INE1
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) April 13, 2024
दिपेंद्र सिंह एरीनं एकाच ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स मारण्याची पहिलीच वेळ नाही. त्यानं यापूर्वी मंगोलिया विरुद्ध देखील आशियाई स्पर्धेत सलग सिक्स मारले होते. मात्र, ते एकाच ओव्हरमध्ये नव्हते.
नेपाळनं मंगोलिया विरुद्धच्या मॅचमध्ये टी-20 मॅचमध्ये 3 विकेटवर 314 धावा केल्या होत्या. टी-20 क्रिकेटमध्ये तिनशे धावांचा टप्पा पार होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या मॅचमध्ये दिपेंद्र सिंह एरीनं 10 बॉलमध्ये 52 धावा केल्या होत्या. नेपाळनं मंगोलियाला 41 धावांवर बाद केलं होतं.
युवराज सिंगनं कधी मारले होते सहा सिक्स?
भारतानं पहिला टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये जिंकला होता. त्या वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगनं इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते. इंग्लंडचा ऑलराऊंडर फ्लिंटॉफ सोबत वाद झाल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये युवराज सिंगनं स्टुअर्ट ब्रॉडला एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते.
संबंधित बातम्या :