पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
IPL 2024 RR vs KKR LIVE Score : हैदराबादने पंजाबचा पराभव करत प्लेऑफमध्ये रंगत निर्माण केली. राजस्थानला दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये विजयाची गरज आहे. पण गुवाहाटी येथे पावसाने हजेरी लावली आहे.
IPL 2024 RR vs KKR LIVE Score : हैदराबादने पंजाबचा पराभव करत प्लेऑफमध्ये रंगत निर्माण केली. राजस्थानला दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये विजयाची गरज आहे. पण गुवाहाटी येथे पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील सामना उशीराने सुरुवात होणार आहे. पावसामुळे राजस्थानचं टेन्शन वाढले आहे. कारण, राजस्थानचे 16 गुण आहेत, ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर हैदराबाद 17 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी राजस्थानला विजय गरजेचा आहे. सामना झाला नाही तर राजस्थान आणि हैदराबाद यांचे समान गुण होतील, पण हैदराबादचा रनरेट चांगला असल्यामुळे ते दुसऱ्या स्थानावर राहतील.
🚨 Update from Guwahati 🚨
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
Toss in the #RRvKKR clash has been delayed due to rain 🌧️
Stay tuned for further updates.
Follow the Match ▶️ https://t.co/Hid26cHubo#TATAIPL
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आयपीएल 2024 मधील अखेरचा साखळी सामना होणार आहे. दोन्ही संघाने प्लेऑफमध्ये आधीच प्रवेश केलाय. कोलकाता अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण राजस्थानला दुसऱ्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवावाच लागेल. गुवाहाटीच्या मैदानावर हे दोन्ही संघ आमनेसामने असीतल. राजस्थानने मागील साखळी सामन्यात कोलकाताचा दोन विकेट्सने पराभव केला होता. आता बदला घेण्याच्या इराद्याने केकेआर मैदानात उतरेल. पण हेड टू हेड रेकॉर्ड पाहिल्यास, दोन्ही संघ समान पातळीवर आहेत. केकेआरने या मोसमात 13 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 9 जिंकले आहेत आणि 3 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचे 19 गुण आहेत. राजस्थानने यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी 13 सामने खेळले असून 8 जिंकले आहेत. 5 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थानचे 16 गुण आहेत.
#IPL should not be conducted in Flood Prone area… why why
— Kamalraj Singh (@kamalrajsingh_) May 19, 2024
Match between #RRvsKKR will not start today in Barsapara Stadium 😭😭,
Clouds rained on my dream of becoming a millionaire through Dream11. 💔😭#RRvKKR #KKRvsRR #KKRvRR #Guwahati pic.twitter.com/G6VWjgf2vG
राजस्थान आणि कोलकाता संघाची संभाव्य प्लेईंग 11
राजस्थान रॉयल्सची प्लेईंग 11 : यशस्वी जायसवाल, टॉम कोहलर-केडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, अवेश खान, युजवेंद्र चहल
कोलकाता नाइट राइडर्सची प्लेईंग 11 : रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिशेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती