IPL 2024, RR vs GT : राजस्थानचा पलटवार, सॅमसन अन् परागनं शुभमनचा खेळ बिघडवला, गुजरातसमोर किती धावांचं आव्हान?
GT vs RR : राजस्थानचा डाव कर्णधार संजू सॅमसननं आणि रियान पराग यांनी सावरला आहे. दोघांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थाननं कमबॅक केलं.
जयपूर : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात 24 वी मॅच सुरु आहे. गुजरात टायटन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. राजस्थानच्या यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी सावध सुरुवात केली होती. मात्र, राजस्थानचे दोन्ही सलामीवीर मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन आणि रियान परागनं डाव सावरला. गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा राजस्थानच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवलं होतं. मात्र, नंतर राजस्थानच्या फलंदाजांनी गियर बदलला. राजस्थान रॉयल्सनं गुजरातपुढं 3 विकेटवर 196 धावा केल्या. गुजरात टायटन्सला विजयासाठी आता 20 ओव्हर्समध्ये 197 धावा कराव्या लागतील.
रियान पराग आणि संजू सॅमसनची अर्धशतकं
रियान पराग आणि संजू सॅमसन यांनी सुरुवातीला संयमी खेळी केली आणि त्यानंतर गदुरातच्या बॉलिंगचा अंदाज घेत फटकेबाजी सुरु केली. रियान पराग आणि संजू सॅमसन अर्धशतक करुन डाव सावरला. रियान परागनं 76 धावांची खेळी केली यामध्ये त्यानं 5 षटकार आणि 3 चौकार मारले. कर्णधार संजू सॅमसननं देखील अर्धशतक केलं. संजू सॅमसननं नाबाद 68 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर आज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. यशस्वी जयस्वालनं आज 24 धावांची खेळी केली. आज त्याला सूर गवसला आहे, असं वाटत असताना त्याला उमेश यादवनं बाद केलं. दुसरीकडे राजस्थानला आरसीबी विरुद्ध मॅच जिंकवून देणाऱ्या जोस बटलर 8 धावा करुन बाद झाला.
गुजरात कमबॅक करणार?
गुजरात टायटन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या पाच पैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवत त्यांचा कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. गुजरातचा कॅप्टनं शुभमन गिल आज संघाला विजय मिळवून देणार का हे पाहावं लागणार आहे.
राजस्थानचा पलटवार
राजस्थान रॉयल्सनं सुरुवातीला जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर सावध सुरुवात केली होती. कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी अंदाज घेत जोरदार फटकेबाजी केली. राजस्थानच्या पहिल्या 10 ओव्हर्समध्ये 2 बाद 73 धावा केल्या होत्या. पुढच्या 10 ओव्हर्समध्ये राजस्थाननं 123 धावा काढल्या. रियान पराग आणि संजू सॅमसन यांनी झळकवलेल्या अर्धशतकांच्या जोरावर राजस्थाननं 20 ओव्हर्समध्ये 3 बाद 196 धावा केल्या. आता गुजरात टायटन्स राजस्थाननं दिलेलं आव्हान पूर्ण करणार का हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :