एक्स्प्लोर

Virat Kohli : विराट कोहलीचं वर्तन चुकीचं, वाद घालायला नको होता, इरफान पठाणनं सगळं समजावून सांगितलं...

Virat Kohli : विराट कोहलीनं कोलकाता विरुद्धच्या मॅचमध्ये मैदानावरील पंचांसोबत वाद घातला. यावरुन इरफान पठाण यानं त्यानं खडे बोल सुनावले आहेत.

IPL 2024 कोलकाता:  कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात रोमहर्षक सामना पार पडला. यामध्ये कोलकातानं एका रननं विजय मिळवला. कोलकातानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 222 धावा केल्या होत्या. आरसीबीची टीम या धावसंख्येंचा पाठलाग करताना 221 धावा  करु शकली. आजच्या मॅचमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे विराट कोहलीची विकेट, आरसीबीच्या डावाची आक्रमक सुरुवात विराट कोहलीनं केली होती. विराट कोहली (Virat Kohli) 18 धावांवर हर्षित राणाच्या बॉलवर बाद झाला. हर्षित राणानं त्याला फुल टॉस टाकला होता. विराटनं हा बॉल फुलटॉस असल्यानं डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये हा बॉल नो बॉल नसल्याचं स्पष्ट झालं. थर्ड अम्पायरनं विराट कोहली आऊट असल्याचा निर्णय दिला. यानंतर विराट कोहलीनं अंपायरबरोबर वाद घाला. या प्रकरणी इरफान पठाणनं (Irfan Pahan) भाष्य केलं.   

इरफान पठानने विराट कोहलीनं पंचांबरोबर घातलेल्या वादावर परखड भाष्य केलं आहे. बीसीसीआयनं आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंची  ऊंची मोजली आहे. यामुळं तंत्रज्ञानाला चुकीचं ठरवलं जाऊ शकत नाही. विराट कोहली आऊट होता हे स्पष्टपणे दिसत आहे, असं इरफान पठाण म्हणाला.   

विराट कोहलीची या प्रकरणातील भूमिका योग्य नाही. विराट कोहली ज्या बॉलवर आऊट झाला त्यावेळी तो क्रीजच्या बाहेर उभा होता. त्यामुळं त्याला बाद देण्यात आलं. विराट कोहली जर क्रीजच्या आत असता तर तो बॉल त्याच्या कमरेच्या ऊंची पेक्षा खाली असता, असं इरफान पठाण म्हणाला.  

केकेआरचा शेवटच्या बॉलवर विजय

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये अखेरच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलपर्यंत मॅच गेली. शेवटच्या ओव्हरमध्ये आरसीबीला 21 रन हव्या होत्या आणि त्यांच्याकडे दोन विकेट होत्या. कर्ण शर्मानं पहिल्या चार बॉलमध्ये तीन सिक्स मारले. पाचव्या बॉलवर तो बाद झाला. अखेरच्या बॉलवर तीन रन हव्या असताना बंगळुरुला केवळ एक रन काढता आली. दुसऱ्या रनवर त्यांचा खेळाडू धावबाद झाला यामुळं सुपरओव्हरचा टप्पा टळला. यानंतर केकेआरनं एका रननं विजय मिळवला.  

संबंधित बातम्या : 

Video : जोरात बॅट झटकली, अम्पायरवर गेला धावून, आऊट दिल्यानं विराट खवळला; मैदानातच रागराग!

 IPL 2024, RCB vs KKR : बाप रे बाप! रघुवंशीला आऊट करण्यासाठी कॅमरूननं हे काय केलं? झेल पाहून सगळेच अवाक्! पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget