Video : जोरात बॅट झटकली, अम्पायरवर गेला धावून, आऊट दिल्यानं विराट खवळला; मैदानातच रागराग!
Virat Kohli : आरसीबीचा मुख्य फलंदाज विराट कोहलीच्या विकेटवरुन ईडन गार्डन्सवर प्रचंड राडा झाला. फुलटॉस बॉल नो न दिल्यावरुन विराट कोहलीचा पारा चढला होता.
कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यातील मॅचमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद 222 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना आरसीबीकडून विराट कोहली (Virat Kohli ) आणि फाफ डु प्लेसिसनं डावाची सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं सुरुवातीच्या दोन ओवर्समध्ये जोरादर फटकेबाजी केली होती. विराट कोहलीनं बॅटिंगची सुरुवात देखील आक्रमक केली होती. त्यानं 2 सिक्स आणि एक फोरच्या जोरावर 18 धावा केल्या होत्या. विराट कोहली तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बाद झाला, हर्षित राणानं विराटला फुलटॉस टाकला होता. तो विराटल त्यावर मोठा फटका मारता आला नाही. विराटनं मारलेला बॉल थेट हर्षित राणाच्या हातात गेला. मैदानावरील अम्पायरनं विराट कोहलीला बाद दिलं. यानंतर विराट कोहलीनं डीआरएस घेतला. थर्ड अम्पायरच्या निर्णयावर देखील विराट कोहलीनं नाराजी व्यक्त केली.
विराट कोहली प्रचंड संतापला, अम्पायरशी पंगा
विराट कोहलीनं आक्रमक सुरुवात केली होती. त्यानं सहा बॉलमध्येच 2 सिक्स आणि एक चौकार मारला होता. विराट कोहली मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असतानाच तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल हर्षित राणानं फुलटॉस टाकला. विराटसाठी असा बॉल अनपेक्षित होता. विराटला यावर मोठा फटका मारता आला नाही. विराटनं मारलेला बॉल हर्षित राणानं झेलला. यानंतर खऱ्या अर्थानं वादाला सुरुवात झाली.
मैदानावरील पंचांनी बाद दिल्यानंतर विराट कोहलीनं डीआरएस घेतला होता. थर्ड अम्पायरनं रिप्ले बघून कोहलीनं शॉट मारला त्यावेळी बॉल किती उंचीवर होता हे पाहून विराटला बाद दिलं. यावरुन विराट कोहली संतापला. विराटनं मैदानावर असलेल्या पंचांना सुनावलं. विराटनं थर्ड अम्पायरच्या निर्णयाबद्दल देखील नाराजी व्यक्त केली.
आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं विराट कोहलीचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. विराट कोहली नाराजी व्यक्त करत मैदानाबाहेर गेला.
आंद्रे रसेल नॉटआऊट
विराट कोहली ज्या प्रकारे आऊट झाला होता तसाच प्रकार कोलकाता नाईट रायडर्सच्या बॅटिंग वेळी घडला होता. लॉकी फर्ग्युसनच्या बॉलिंग करत असताना 14 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर रिंकू सिंग बाद झाला. यानंतर फलंदाजीला आंद्रे रसेल आला होता. आंद्रे रसेलला लॉकी फर्ग्युसननं फुल टॉस टाकला. आंद्रे रसेलच्या बॅटला बॉल लागून विकेटकीपरच्या हातात गेला. यावर रसेलनं डीआरएस घेतला. हा डीआरएस रसेलच्या बाजून गेला. रसेल नो बॉलच्या बाबतीत लकी ठरला मात्र विराट कोहली अनलकी ठरल्याचं दिसून आलं.
संबंधित बातम्या :