(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पाठिंबा देण्यासाठी एबी डिव्हिलीयर्स भारतात दाखल; काय म्हणाला?, पाहा
IPL 2024 RCB: बंगळुरु आणि राजस्थानचा 22 मे रोजी एलिमिनेटरचा सामना रंगेल. एलिमिनेटरचा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर होणार आहे.
IPL 2024 RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जला (CSK) बंगळुरुनं 27 धावांनी पराभूत केलं. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 17 धावांची गरज होती. बंगळुरुच्या यश दयालने एक विकेट घेत केवळ 7 धावा दिल्या आणि बंगळुरुचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला.
आयपीएलच्या गुणतालिकेत बंगळुरुचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरु आणि राजस्थानचा 22 मे रोजी एलिमिनेटरचा सामना रंगेल. एलिमिनेटरचा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर होणार आहे. या सामन्यात विजयी झालेला संघ 24 मे रोजी क्वालिफायर 2 चा सामना खेळेल.
बंगळुरुचा संघ प्ले ऑफच्या फेरीत पोहचल्यानंतर संघातील खेळाडूंसह बंगळुरुचे चाहते, आजी-माजी खेळाडू खूप उत्साहित आहेत. सोशल मीडियावर देखील बंगळुरुने यंदातरी आयपीएलचं जेतेपद पटकावं, अशी प्रतिक्रिया दिली जात आहे. चेन्नई आणि बंगळुरुचा सामना असताना माजी खेळाडू ख्रिस गेलने भारतात येऊन चिन्नास्वामी मैदानावर उपस्थिती लावली. यानंतर आता एबी डिव्हिलीयर्स देखील बंगळुरुला पाठिंबा देण्यासाठी भारतात दाखल झाला आहे. मुंबईला येणे खूप आवडते, मी आयपीएल नॉक आउट्ससाठी येथे आलो आहे. आरसीबीचा संघ प्ले ऑफसाठी पात्र झाला आहे, आम्ही सर्व खूप उत्साहित आहोत, असं एबी डिव्हिलीयर्सने सांगितले.
AB De Villiers said "Love coming to Mumbai, I am here for IPL Knockouts - RCB qualified for playoffs, we all are so excited - Go RCB". pic.twitter.com/MzaQfwJEkV
— Johns. (@CricCrazyJohns) May 21, 2024
बंगळुरुने तीनवेळा खेळलाय अंतिम सामना-
बंगळुरुचा संघ तीनवेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात दाखल झाला होता. परंतु बंगळुरुला जेतेपद पटकावण्यात यश मिळाले नाही. यंदा आयपीएलचं पहिलं जेतेपद पटकवण्यासाठी बंगळुरुचा संघ खूप उत्सुक आहे. बंगळुरुने सगळ्यात पहिले 2009 साली अंतिम सामना खेळला होता. यानंतर 2011 आणि 2016 साली बंगळुरुने अंतिम सामना खेळला होता.
प्ले ऑफचं वेळापत्रक
21 मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद ( क्वालिफायर 1)
22 मे - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, अहमदाबाद ( एलिमिनेटर )
24 मे - क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता, चेन्नई ( क्वालिफायर 2)
26 मे - क्वालिफायर 1 मधील विजेता संघ वि. क्वालिफायर 2 विजेता, चेन्नई ( फायनल)