IPL 2024: ऑस्ट्रेलियन खेळाडूने राजस्थान रॉयल्सला फसवले, शेवटच्या क्षणी IPL मधून घेतली माघार
IPL 2024: राजस्थान रॉयल्स संघ 24 मार्च रोजी स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे.

IPL 2024: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू ॲडम झम्पाने वैयक्तिक कारणांमुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2024)मधून माघार घेतली आहे. राजस्थान रॉयल्सने ॲडम झम्पाला गेल्या वर्षीच्या लिलावापूर्वी दीड कोटी रुपयांना आपल्या संघात कायम ठेवले होते.
ॲडम झम्पाने आयपीएलमधून माघार घेतल्याच्या माहितीवर संघाच्या व्यवस्थापकाने पुष्टी केली आहे. रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्यासह राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या तीन फिरकीपटूंमध्ये ॲडम झम्पाचा समावेश होता. गेल्या वर्षी त्याने या फ्रँचायझीसाठी 6 सामने खेळले ज्यात त्याने 23.50 च्या सरासरीने 8 विकेट घेतल्या. ॲडम झम्पाच्या अचानक माघार घेतल्याने राजस्थान रॉयल्सचे गोलंदाजी आक्रमण कमकुवत होईल. याआधी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा दुखापतीमुळे आधीच आयपीएलमधून बाहेर पडला होता.
प्रसिध कृष्णा आणि ॲडम झम्पा माघार घेतल्यानंतर संघाने या दोन खेळाडूंच्या बदलीची घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र, लवकरच संघ या दोन खेळाडूंच्या बदलीची घोषणा करेल, असे सांगण्यात येत आहे. ॲडम झम्पाने आयपीएलमध्ये आपल्या संघासोबत असे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो कोरोनाच्या काळात टूर्नामेंटच्या मध्यावर आपल्या देशात परतला होता.
So hyped! @UbonIndia 🔥💗 pic.twitter.com/ekVGe6iFkZ
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 21, 2024
24 मार्चला राजस्थानचा पहिला सामना
राजस्थान रॉयल्स संघ 24 मार्च रोजी स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघ लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. अशा स्थितीत पहिल्या सत्रातील चॅम्पियन संघ असलेला राजस्थान रॉयल्स संघ यंदाच्या हंगामात कसे पदार्पण करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या 21 सामन्यांचं शेड्यूल Indian Premier League (IPL) 2024 Schedule:
- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8 वाजता
- पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वाजता
- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30 वाजता
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
- गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, 25 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
- सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वाजता
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता
- गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, दुपारी 3.30 वाजता
- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, वायजैग, संध्याकाळी 7.30 वाजता
- मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 3 एप्रिल, वायझॅग, संध्याकाळी 7.30 वाजता
- गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30 वाजता
- मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता





















