(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 :तीन दिवसांपासून बेडवर, गोळ्या खाऊन दिल्लीची धुलाई, मॅचविनर रियाग परागनं सगळं सांगून टाकलं...
Riyan Parag : राजस्थान रॉयल्सच्या रियान परागनं 84 धावा केल्या होत्या. मॅचनंतर बोलताना त्यानं दिवस बेडवर असल्याची माहिती दिली. वेदनाशामक गोळ्या खात होतो, आता कामगिरीबाबत खूश आहे, असं तो म्हणाला.
जयपूर :आयपीएलच्या (IPL 2024) नवव्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सच्या रियान परागच्या (Riyan Parag) नाबाद 84 धावांच्या खेळीनं विजयाचा पाया रचला गेला.या विजयासह राजस्थाननं गुणतालिकेत दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. रियान परागला त्याच्या नाबाद खेळीबद्दल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. रियान परागनं दिल्ली विरुद्धच्या मॅचपूर्वी तीन दिवस काय केलं हे सांगितलं आहे. रियानं म्हटलंय की, मी कठोर मेहनत केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेडवर होतो.मी वेदनाशामक गोळ्या खात होतो, मी आज बेडवरुन उठलो असून कामगिरीबाबत खूश आहे, असं रियान पराग म्हणाला.
रियान परागनं दिल्ली कॅपिटल्स विरोधात यापूर्वी देखील 49 धावांची खेळी केली होती. दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानची 3 बाद 36 धावा अशी बिकट स्थिती झाली होती. रियान परागनं सुरुवातीला आर. अश्विन आणि त्यानंतर ध्रुव जुरेल आणि हेटमायरसोबत राजस्थानची धावसंख्या 5 बाद 185 पर्यंत पोहोचवली होती. यंदाच्या हंगामात आक्रमकपणे सुरुवात करणाऱ्या रियागसाठी यापूर्वीची आयपीएल फारशी समाधानकारक नव्हती. दिल्ली विरुद्ध त्यानं त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी केली. रियान पराग म्हणाला की, माझ्या आईनं गेल्या तीन ते चार वर्ष माझा संघर्ष पाहिला आहे. माझं माझ्याबद्दलचं मत स्पष्ट आहे. मला काही मिळो अथवा न मिळो, असं रियान पराग म्हणाला.
राजस्थान रॉयल्सनं यापूर्वीच्या हंगामात रियान परागला लोअर ऑर्डरला बॅटिंगसाठी ठेवलं होतं. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रियान परागला बॅटिंगसाठी वरच्या क्रमांकावर पाठवण्यात येत आहे . याचा फायदा राजस्थानच्या संघाला झाल्याचं दिसून येत आहे.
राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन रियान परागच्या कामगिरीवर खूश आहे. संजू सॅमसननं रियान परागचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. रियान परागबद्दल जिथं जाईन तिथं लोक विचारत असतात. रियान पराग भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचं योगदान देऊ शकतो, असं संजू सॅमसन म्हणाला.
Riyan Parag said "In the last 3 days, I was in bed, I was on painkillers - I just got up today & I am very happy with the performance". pic.twitter.com/S1XFwtvi7f
— Johns. (@CricCrazyJohns) March 28, 2024
रियाननं अश्विन, जुरेलच्या साथीनं डाव सावरला
रियान परागनं राजस्थानची स्थिती 3 बाद 36 धावा अशी झाल्यानंतर अश्विन, ध्रुव जुरेल आणि हेटमायर यांच्यासोबत डाव सावरला.अश्विन आणि पराग यांनी 54 धावांची भागिदारी केली. यानंतर रियाननं जुरेल याच्यासोबत भागिदारी करुन राजस्थानचा डाव सावरला. रियान परागनं त्याच्या 45 बॉलमधील 84 धावांच्या खेळीत 7 फोर आणि 6 सिक्सर मारले.
संबंधित बातम्या :
Rishabh Pant : चांगली सुरुवात करुनही अपयश,रिषभ पंत प्रचंड संतापला, आऊट होताच जे केलं ते धक्कादायक