IPL 2024: पहिल्याच मॅचमध्ये 66 धावा दिल्या, मुंबईचा बॉलर ट्रोल, बॅटिंग कोचकडून पाठराखण, म्हणाले...
Kwena Maphaka: सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या क्वेना मफाकाच्या बॉलिंगवर 4 ओव्हर्समध्ये 66 धावा केल्या. यानंतर अनेकांनी क्वेना मफाकावर टीका केली होती.
DJ Bravo and Keiron Pollard On Kwena Maphaka हैदराबाद : सनरायजर्स हैदराबादच्या (Sun Risers Hyderabad) फलदाजांनी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोलदाजांची धुलाई केली. सनरायजर्स हैदराबादनं 3 विकेटवर 277 धावांचा डोंगर उभा केला होता. मुंबईच्या टीमकडून पदार्पण करणाऱ्या क्वेना मफाकाच्या बॉलिंगवर हैदराबादच्या फलदाजांनी फटकेबाजी केली. क्वेना मफाकानं 4 ओव्हर्समध्ये 66 धावा दिल्या. क्वेना मफाकानं अंडर -19 च्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळं त्याला आयपीएलमध्ये संधी देण्यात आली होती. क्वेना मफाकाला चार ओव्हरमध्ये एकही विकेट घेता आली नव्हती. यामुळं क्वेना मफाकावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, मुंबई इंडियन्सचे बॅटिंग कोच असलेल्या किरोन पोलार्ड आणि डीजे ब्रॉवो यांनी मफाकाचं समर्थन केलं आहे.
मफाकाला कुणी समर्थन दिलं
डीजे ब्रॉवो ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मफाकाचा फोटो शेअर करुन त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रॉवो म्हणाला की मला विश्वास आहे, तू नक्कीचं कमबॅक करशील, एका मॅचमुळं तुझ्या क्षमतेवर शंका घेतली जाऊ शकत नाही.हे तुझ्यासाठी आव्हान असेल. जसजशी स्पर्धा पुढे जाईल तू चांगला गोलंदाज बनशी , असं ब्रॉवो म्हणाला.
मुंबईचा बॅटिंग कोच असलेल्या किरोन पोलार्डनं देखील एक पोस्ट लिहून मफाकाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तुझं मनोधर्य कायम ठेव, तुला खूप काही मिळवायचं आहे, आम्हाला विश्वास आहे. तुझ्या कुटुंबासह, मित्र आणि चाहत्यांना तुझा अभिमान आहे.तुझं भविष्य उज्ज्वल आहे, असं पोलार्डनं म्हटलं आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर डीजे ब्रॉवो आणि किरोन पोलार्डची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय नेटकरी देखील त्या पोस्टवर कमेंट करत आहेत.
किरोन पोलार्डकडून हार्दिक पांड्याचंही समर्थन
गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर हार्दिक पांड्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली होती. हार्दिक पांड्यानं गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये घेतलेल्या निर्णयांवरुन त्याला ट्रोल करण्यात येत होतं. हार्दिक पांड्याच्या पाठिंब्यासाठी किरोन पोलार्ड समोर आला होता. मॅचमध्ये घेतलेले निर्णय हार्दिक पांड्याचे एकट्याचे निर्णय नव्हते. संघाचं मॅनेजमेंट आणि हार्दिक पांड्यानं मिळून निर्णय घेतले होते, असं पोलार्ड म्हटलं. हार्दिक पांड्यानं गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. या वरुन देखील त्याच्यावर टीका करण्यात आली होती. पोलार्डनं या बाबतीतही हार्दिक पांड्याचं समर्थन केलं होतं. आता त्यानं मफाकाचं देखील समर्थन केलं होतं.
संबंधित बातम्या :