Rohit Sharma : मुंबई आणि आरसीबी दुसऱ्या विजयासाठी भिडणार, रोहित शर्माचा व्हिडीओ पोस्ट करत बंगळुरुला मुंबई इंडियन्सचा इशारा
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय दिल्ली कॅपिटल्सवर मिळवला आहे. आता मुंबई दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. मुंबई आणि आरसीबी यांच्यात आज लढत होईल.
मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आज आमने सामने येणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होईल. आयपीएलमधील ही 25 वी लढत असेल. मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये चार पैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स आणि फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील आरसीबी विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरतील.या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सं रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळं आरसीबीचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे.
मुंबई इंडियन्सनं शेअर केलेल्या व्हिडीओत नेमकं काय ?
मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माचा एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात रोहित शर्मा फटकेबाजी करताना दिसत आहे. मुंबईनं रोहितचा हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की आणि आम्ही इथं पाघळलो. कालचं आकाश अंबानी रोहित शर्माला स्वत: वानखेडेवर सोडायला आल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
रोहित शर्मावर मुंबईची मदार
रोहित शर्माला मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलसाठी कर्णधारपदावरुन बाजूला केलं होतं. मुंबईनं हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यानंतर मुंबईला पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई इंडियन्सला पहिला विजय दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये मिळाला होता. रोहित शर्मानं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 49 धावा केल्या होत्या. त्यामध्ये रोहित शर्मां 3 षटकार आणि 6 चौकार मारले होते.
मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माचा व्हिडीओ शेअर करत एक प्रकारे आरसीबीला इशारा दिल्याचं दिसून येत आहे. आरसीबी विरुद्ध देखील रोहित शर्मा चांगली कामगिरी करेल, अशी आशा मुंबई इंडियन्सला आहे.
😯😯
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2024
𝑨𝒖𝒓 𝒚𝒂𝒉𝒂𝒏 𝒉𝒖𝒎 𝒑𝒊𝒈𝒉𝒂𝒍 𝒈𝒂𝒚𝒆 🫠🤌#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @ImRo45 pic.twitter.com/gZm8tEM3YT
रोहित आणि विराटचा सामना
मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स यांच्या विरुद्धच्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईनं त्यानंतर होमग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं. आज मुंबईची लढत आरसीबी विरुद्ध होणार आहे. आरसीबीची कामगिरी यंदाच्या आयपीएलमध्ये देखील निराशाजनक राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जाएंटस आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबीला पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीनं स्पर्धेतील एकमेव विजय पंजाब किंग्ज विरुद्ध मिळवला आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आज दुसऱ्या विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरतील. आज कोण विजयाचा गुलाल उधळणार हे पाहावं लागेल. आजच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सची मदार रोहित शर्मा आणि आरसीबीची मदार विराट कोहलीवर असेल.
संबंधित बातम्या :
आरसीबीचा पराभव करणं सोप्पं नाही, हेड टू हेड आकड्यात मुंबईचं पारडं जड, पण...
विराट-रोहित नव्हे याला बनवा कर्णधार, मालमाल व्हाल, पाहा MI vs RCB ड्रीम टीम!