एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
MI vs PBKS : अटीतटीच्या लढतीत मुंबईचा विजय, पंजाबनं नाकीनऊ आणलं, हार्दिक म्हणाला आम्हाला सुधारणेची ........
Mumbai Indians vs Punjab Kings : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्जला पराभूत केलं. मुंबईचा हा तिसरा विजय ठरला.
![MI vs PBKS : अटीतटीच्या लढतीत मुंबईचा विजय, पंजाबनं नाकीनऊ आणलं, हार्दिक म्हणाला आम्हाला सुधारणेची ........ ipl 2024 mi vs pbks mumbai indians won third match in ipl hardik pandya said better performance from bowling MI vs PBKS : अटीतटीच्या लढतीत मुंबईचा विजय, पंजाबनं नाकीनऊ आणलं, हार्दिक म्हणाला आम्हाला सुधारणेची ........](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/19/cc2851d7681eed086ef3e11511c0cb831713466456069989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई इंडियन्सचा विजय
Source : X : Mufadlal Vohra
चंदीगड : आयपीएल (IPL 2024) मध्ये 33 वी मॅच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings ) यांच्यात पार पडली. यंदाच्या आयपीएलच्या गुणतालिकेत आठव्या नवव्या स्थानावर असलेल्या मुंबई आणि पंजाबमध्ये आजची लढत पार पडली. मुंबईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये सात विकेटवर 192 धावा केल्या. यामध्ये सूर्यकुमार यादवची 78 धावांची खेळी केली. पंजाब आणि मुंबई यांच्यातील ही लढत अटीतटीची झाली. पंजाब किंग्जचा संघ 183 धावांवर बाद झाला आणि मुंबईनं 9 धावांनी विजय मिळवला. आशुतोष शर्मा आणि शशांक सिंगला पंजाबच्या इतर फलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही, त्यामुळं पंजाबचा निसटता पराभव झाला.
शशांक आशुतोषची झुंज व्यर्थ
मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करत विजयासाठी ठेवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. पंजाबला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का बसला. पंजाब किंग्जनं धावसंख्येचा पाठलाग करताना सातत्यानं जाणाऱ्या विकेट न गमावण्याकडे लक्ष दिलं नाही.मुंबईच्या बॉलर्सनी पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके मारु दिले नाहीत.शशांक सिंग, आशुतोष शर्मा या दोन्ही फलंदाजांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. आशुतोष शर्मानं 61 धावा केल्या. शर्मानं 28 बॉलमध्ये 7 षटकार आणि 2 चौकारासह 61 धावा केल्या. दुसरीकडे पंजाब किंग्जचा फलंदाज शशांक सिंगनं 3 षटकार आणि दोन चौकारासंह 41 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये 12 धावा हव्या असताना पंजाबचा शेवटचा खेळाडू धावबाद झाल्यानं मुंबईनं विजय मिळवला.
दोन्ही संघांचे कॅप्टन काय म्हणाले?
सॅम कर्रननं आम्ही गेल्या काही मॅचेस थोड्या अंतरानं गमावल्याचं म्हटलं. पंजाब किंग्जचा हा स्पर्धेतील पाचवा पराभव ठरला असला तरी पंजाबच्या युवा शिलेदारांनी तगडी टक्कर दिली. सॅम कर्रननं देखील आशुतोषचं कौतुक केलं.
हार्दिक पांड्याकडून आशुतोषचं कौतक
हार्दिक पांड्यानं पंजाब किंग्जच्या आशुतोषच्या फलंदाजीचं कौतुक केलं. मुंबईच्या फलंदाजांकडून चांगली कामगिरी होत असून बॉलिंगमध्ये सुधारणा होण्याची गरज असण्याचं हार्दिक पांड्या म्हणाला. जसप्रीत बुमराहनं आम्हाला वाटलं नव्हती तितकी अटीतटीची मॅच झाल्याचं म्हटलं.
सूर्यकुमार यादवचं अर्धशतक
हार्दिक पांड्यानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं 20 ओव्हरमध्ये सात विकेटवर 192 धावा केल्या. सूर्यकुमार यादवशिवाय रोहित शर्मानं देखील 25 बॉलमध्ये 36 धावांची खेळी देखील केली. याशिवाय टिम डेविडनं 14 तर तिलक वर्मानं 34 धावा केल्या. पंजाबकडून हर्षल पटेल यानं तीन विकेट घेतल्या. तर सॅम करननं देखील दोन विकेट काढल्या.
मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या आयपीएलमध्ये चौथी मॅच खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवनं 53 बॉलमध्ये 3 षटकार आणि सात चौकारांच्या जोरावर 78 धावांची खेळी केली.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)