LSG vs DC : कुलदीप -खलीलनं धक्के दिले, बदोनी दिल्लीचा खेळ बिघडवला, लखनौनं किती धावा केल्या?
DC vs LSG : दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळं लखनौच्या प्रमुख फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. लखनौ कॅपिटल्सनं 20 ओव्हर्समध्ये 167 धावा केल्या.
लखनौ : आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) यांच्यात 26 मॅच सुरु आहे. लखनौचा कॅप्टन केएल. राहुल यानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक आणि केएल. राहुल यांनी डावाची सुरुवात आक्रमक केली होती. लखनौच्या आक्रमक सलामीवीरांची जोडी फोडण्याचं काम दिल्ली कॅपिटल्सच्या खलील अहमदनं केलं. खलील अहमदनं डावाच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये क्विंटन डीकॉकला बाद केलं. खलील अहमद आणि कुलदीप यादवनं लखनौच्या धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम केलं. आयुष बदोनी आणि अरशद खानच्या बॅटिंगमुळं लखनौनं कमबॅक केलं. लखनौनं 20 ओव्हर्समध्ये 7 विकेटवर 167 धावा केल्या.
लखनौचा कॅप्टन केएल.राहुलनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. लखनौनं यापूर्वी होम ग्राऊंडवर पहिल्यांदा बॅटिंग करत खेळलेल्या मॅचेस जिंकल्या होत्या. त्यामुळं आज देखील राहुलनं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आजचा पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय फसल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. खलील अहमद आणि कुलदीप यादवनं लखनौच्या धावसंख्येला ब्रेक लावला. केएल राहुलनं 39, क्विंटन डी कॉकनं 19 आणि दीपक हुडानं 10 धावा केल्या.
आयुष बदोनीनं डाव सावरला
लखनौचे प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आयुष बदोनी आणि अरशद खाननं डाव सावरला. 13 व्या ओव्हरमध्ये लखनौच्या 94 धावांवर 7 विकेट पडल्या होत्या. मात्र त्यानंतर आयुष बदोनीनं तिसरं अर्धशतक झळकावत लखनौचा डाव सावरला आहे. आयुष बदोनीनं 55 तर अरशद खाननं 20 धावा केल्या.
खलील अहमद आणि कुलदीपनं रिषभ पंतचा विश्वास सार्थ ठरवला
दिल्ली कॅपिटल्सचे बॉलर्र खलील अहमद यानं क्विंटन डी कॉक आणि देवदत पडीक्कलला बाद केलं. यानंतर लखनौचा डाव सावरतो की काय असं चित्र दिसत असताना आजच्या मॅचमध्ये कमबॅक करणाऱ्या कुलदीप यादवनं लखनौच्या तीन प्रमुख फलंदाजांना बाद केलं. मार्कस स्टॉयनिस, केएल. राहुल आणि निकोलस पूरनला कुलदीप यादवनं बाद केलं. यानंतर लखनौला इशांत शर्मानं सहावा धक्का दिला. मुकेश कुमारनं लखनौला सातवा धक्का दिला. कृणाल पांड्या 3 धावा करुन बाद झाला.
लखनौ चौथा विजय मिळणार की दिल्ली जाएंट किलर ठरणार?
लखनौ सुपर जाएंटसनं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत चार मॅच खेळलेल्या आहेत. त्यापैकी तीन मॅचमध्ये त्यांना विजय मिळालेला आहे. आजच्या मॅचमध्ये चौथा विजय मिळवण्याची त्यांच्याकडे संधी आहे. दिल्ली कॅपिटल्सला देखील आज दुसरा विजय मिळवण्याची संधी आहे. रिषभ पंतच्या टीममध्ये कमबॅक करणाऱ्या कुलदीप यादवनं टीमला हवी असलेली कामगिरी करुन दाखवली आहे.
दरम्यान, लखनौ सुपर जाएंटस सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स दहाव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या :
Virat Kohli : विराट कोहलीला कॅप्टन करा तरच आरसीबी लढेल आणि जिंकेल, माजी क्रिकेटपटूची मोठी मागणी