IPL 2024 Latest Points Table: चेन्नईचा विजय, फायदा राजस्थानला; कोण कुठल्या स्थानी, पाहा आयपीएलचे Latest Points Table
IPL 2024 Latest Points Table: चेन्नईने केकेआरविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत बदल झाला आहे.
IPL 2024 Latest Points Table: चेन्नई सुपर किंग्सने कमी धावसंख्येच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा 7 गडी राखून पराभव केला. कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम खेळताना 137 धावा केल्या होत्या, दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी एका बाजूला विकेट्स रोखून ठेवल्या आणि दुसऱ्या बाजूला धावफलक सुरू ठेवला. चेन्नईने 18 चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या 67 धावांच्या नाबाद अर्धशतकाने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
केकेआरने आयपीएल 2024 च्या या हंगामात सलग 3 विजय नोंदवले होते, परंतु चेन्नई केकेआरच हा विजयरथ रोखला आणि या हंगामात त्यांना पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे. तर चेन्नईने सलग 2 पराभवानंतर केकेआरविरुद्ध आजचा सामना जिंकला. चेन्नईने केकेआरविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत बदल झाला आहे. राजस्थान रॉयल्स अजूनही गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 4 सामने खेळले असून या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. आजच्या चेन्नईच्या विजयाचा फयदा राजस्थाना झाला आहे. कारण कोलकाता आज विजयी झाल्यास गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला असता. मात्र चेन्नईने केकेआरचा पराभव केल्याने राजस्थानचा संघ अव्वल स्थानी कायम राहिला आहे.
कोलकाता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. कोलकाताने चार सामन्यात 3 विजय मिळवला आहे. तर आज चेन्नईविरुद्ध पराभवाचा त्यांना सामना करायला लागला. कोलकाताचे 6 गुण आहेत. लखनौही 6 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे, तर चेन्नईने आजच्या विजयासह गुणतालिकेत चौथं स्थान कायम ठेवलं आहे. चेन्नईचा एकुण 5 सामन्यात 3 विजय आणि 2 पराभव झाला आहे. हैदराबाद पाचव्या क्रमांकावर असून पंजाब सहाव्या स्थानी आहे. हैदराबाद आणि पंजाबचे 4 गुण आहेत. गुजरात सातव्या क्रमांकावर, मुंबई आठव्या क्रमांकावर, बंगळुरु नवव्या स्थानी असून दिल्लीचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे.
IPL 2023 Points table getting tight.
— Johns. (@CricCrazyJohns) April 8, 2024
- The best league in the world. pic.twitter.com/uDCiYTLAy6
ऋतुराज गायकवाड चमकला-
आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद मिळाल्यानंतर रुतुराज गायकवाड फलंदाजीत खूप संघर्ष करत होता. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने 46 धावांची खेळी खेळली असली तरी उर्वरित 3 डावात तो फलंदाजीत काही खास दाखवू शकला नाही. आता कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात संथ खेळपट्टीवर जबाबदारी स्वीकारत त्याने 58 चेंडूत 67 धावांची खेळी करत फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हे दाखवली आहेत. या खेळीत त्याने 9 चौकार मारले.
संबंधित बातम्या:
IPL 2024: आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांमध्ये स्पष्ट झाले; हे 2 संघ प्लेऑफमध्ये नक्की पोहचणार!