(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Indians Rohit Sharma: 'हेच हवं आहे...'; मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहितने हार्दिक पांड्याबाबत केलं विधान
Mumbai Indians Rohit Sharma: रोहितचे अर्धशतक हुकले असले तरी ड्रेसिंग रुममधील त्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्याला प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्याकडून विशेष पुरस्कार मिळाला.
Mumbai Indians Rohit Sharma: मुंबई: मुंबई इंडियन्सने रविवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा 33 धावांनी पराभव करून इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मधील हंगामातील पहिला सामना जिंकला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली हा पहिला विजय असला तरी रोहित शर्माने 27 चेंडूत 49 धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला.
रोहितचे अर्धशतक हुकले असले तरी ड्रेसिंग रुममधील त्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्याला प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्याकडून विशेष पुरस्कार मिळाला. इतकंच नाही तर रोहितने सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये एक खास भाषणही केलं. यामध्ये रोहितने कर्णधार हार्दिक पांड्याबद्दलही वक्तव्य केलं. सदर व्हिडीओ मुंबई इंडियन्सने एक्स (आधीचे ट्विटर)वर शेअर केला आहे.
रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला?
संघाने खूप चांगली फलंदाजी केली. पहिल्या सामन्यापासून आम्ही सर्वजण हे करण्याचा प्रयत्न करत होतो. संपूर्ण संघाने एकत्रित फलंदाजी केली तर वैयक्तिक कामगिरीत फरक पडत नाही हे यावरून दिसून येते. जर आपण संघाचे लक्ष्य पाहिले तर आपण अशा प्रकारची धावसंख्या गाठू शकतो. रोहित शर्मा पुढे म्हणाला, 'ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल आपण खूप दिवसांपासून बोलत आहोत. फलंदाजी प्रशिक्षक (पोलार्ड), मार्क (बाउचर) आणि कर्णधार (हार्दिक) यांना हेच हवे असते. खूप छान वाटले, असं रोहित शर्माने सांगितले.
A 𝐑𝐨 special at Wankhede. A 𝐑𝐨 special in the dressing room. 🎖️💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvDC | @ImRo45 pic.twitter.com/b555HUvVdE
— Mumbai Indians (@mipaltan) April 8, 2024
हार्दिक पांड्याचा आनंद गगनात मावेना -
विजेता कर्णधार होणं, प्रत्येकालाचं आवडतं. ही बाब माझ्यासाठी खासच आहे. विजयासाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. मानसिकता बदलण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले. संघ बांधणी करण्यासाठी आम्ही काही बदलही केले. संघ व्यवस्थित स्थिर-स्थावर व्हायला हवा, संघात थोडेफार बदल होऊ शकतो, पण हेच 12 खेळाडू घेऊन आम्ही पुढील सामन्यात मैदानात उतरु असं मला वाटतं. पहिल्या तीन सामन्यात पराभव झाला होता, पण मुंबई इंडियन्स कमबॅक करेल असा सर्वांनाच विश्वास होता. आजूबाजूच्या लोकांकडून सपोर्ट आणि प्रेम मिळत होतं. आम्हाला फक्त एका विजयाची गरज आहे, त्यानंतर गाडी रुळावर येईल, याबाबत चाहत्यांना विश्वास होता. आम्हाला पहिला विजय मिळाला असून स्पर्धा आमच्यासाठी आजपासून सुरु झाली. आजच्या सामन्यात मैदानातही चाहत्यांकडूनही चांगला पाठिंबा मिळाला, असे हार्दिक पांड्या म्हणाला.
यंदाच्या हंगामात मुंबईचा पहिला विजय-
मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवला आहे. पहिल्या तीन मॅचमधील पराभवानंतर होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सनला पहिला विजय मिळाला आहे. मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 5 विकेटवर 234 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सला 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 205 इतक्या धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 29 धावांनी विजय मिळवला.