एक्स्प्लोर

IPL 2024: संजीव गोयंकांनी झापलं, आता केएल राहुलने उचललं मोठं पाऊल; आजचा सामना खेळण्यावरही प्रश्नचिन्ह!

IPL 2024 LSG KL Rahul: आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये कायम राहण्यासाठी लखनौला उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे.

IPL 2024 LSG KL Rahul: लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यातील मॅचनंतर केएल राहुल (KL Rahul) आणि संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांच्यात वाद झाला होता. लखनौ सुपर जाएंटसचे मालक संजीव गोयंका यांनी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर केएल राहुलला ऑन कॅमेरा जाब विचारला होता. यावरुन संजीव गोयंका यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. या वादाचे पडसाद अद्याप उमटत आहेत.

आज लखनौ आणि दिल्ली यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये कायम राहण्यासाठी लखनौला उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. मात्र याचदरम्यान केएल राहुलने मोठं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीसाठी केएल राहुल संघासोबत काल रात्रीपर्यंत तरी दिल्लीत दाखल झाला नव्हता आणि त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतोय. लखनौचा संघ 12 सामन्यांत 12 गुणांसह सातव्या स्थानावर आहेत आणि दिल्ली व मुंबई यांच्याविरुद्धचा सामना जिंकून लखनौला 16 गुणांसह प्ले ऑफसाठी दावा सांगता येईल. त्यांना नेट रन रेटही सुधारावा लागेल. हे गणित लक्षात घेता दिल्लीविरुद्धचा आजचा सामना महत्त्वाचा आहे.

केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात

क्रिकबझवर चर्चा करताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, "ते सगळे उद्योगपती आहेत आणि त्यांना फक्त नफा-तोट्याची भाषा कळते. पण इथे तोटा नाही, मग तुम्हाला काय अडचण आहे? ते 400 कोटींचा नफा कमावत आहेत आणि हा असा व्यवसाय आहे जिथे त्यांना काहीही करण्याची गरज नाही. तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल कारण परिणाम काहीही असो, त्यांना नफा मिळतो. मालकाचे काम असे असले पाहिजे की जेव्हा तो पत्रकार परिषदेत किंवा ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटतो तेव्हा त्याने त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं सेहवागने सांगितले. 

केएल राहुल लखनौ सोडणार का?

व्हायरल व्हिडिओमध्ये केएल राहुल संजीव गोयंका यांच्यासमोर उभं राहून सर्व काही ऐकत होता. अशा परिस्थितीत लोक असा अंदाज लावू लागले की केएल राहुल आयपीएल 2024 नंतर लखनौ सुपर जायंट्स सोडू शकतात. याशिवाय, लीग टप्प्यातील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये राहुल कदाचित LSG चे नेतृत्व करणार नसल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राहुलने 33 चेंडूत 29 धावा केल्या होत्या.

संबंधित बातम्या:

IPL 2024: आयपीएलमधील विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस, पाहा बक्षिसांची रक्कम

IPL 2024 RCB: पहिल्या 8 सामन्यात 7 पराभव, त्यानंतर सलग 5 सामने जिंकले; बंगळुरुने कसे नशीब बदलले?, जाणून घ्या

चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget