एक्स्प्लोर

IPL 2024 Virat Kohli And Ishant Sharma: चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video

IPL 2024 RCB vs DC: दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली स्फोटक शैलीत फलंदाजी करत होता.

IPL 2024 RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील मजेदार प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली स्फोटक शैलीत फलंदाजी करत होता. त्याने केवळ 13 चेंडूत 27 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 3 षटकारही लगावले. या सामन्यात इशांत शर्माने विराट कोहलीला त्याच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच बाद केले, त्यानंतर इशांत शर्माने विराट कोहलीला डिवचत जोरदार सेलिब्रेशन केले. विराट कोहली आणि इशांत शर्मा डोमेस्टिक क्रिकेटच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात आणि अनेकदा विनोद करताना दिसतात.

इशांत शर्माचे मजेदार सेलिब्रेशन

ही घटना रॉयल चॅलेंजर्सच्या डावातील चौथ्या षटकाची आहे. या षटकातील पहिला चेंडू कोहलीच्या बॅट लागून थर्ड मॅनच्या दिशेने चौकार गेला. यानंतर कोहली इशांतला काहीतरी बोलला आणि त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चेंडूवर कोहलीने षटकार टोलावला. षटकार मारल्यानंतर कोहली पुन्हा एकदा इशांतकडे बोट दाखवताना दिसला. इशांतने ओव्हरच्या पहिल्या 3 चेंडूत 1 षटकार आणि एका चौकारासह 11 धावा दिल्या होत्या. इशांतने चौथा चेंडू फुल लेंथवर टाकला, त्यावर कोहलीने फ्रंटफूटवर येऊन चेंडू टोलावला, पण बॅट लागून तो यष्टीरक्षक अभिषेक पोरेलकडे गेला आणि कोहली बाद झाला.  कोहलीचा हा डाव 27 धावांवर संपला. यानंतर विराट कोहलीची विकेट घेतल्यावर इशांत शर्मा त्याला चिडवण्यासाठी त्याच्या जवळ जाऊन धक्काबुक्कीही केल्याचे पाहायला मिळाले.

पाहा व्हिडीओ-

विराट कोहलीचे आयपीएलमध्ये 250 सामने पूर्ण 

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरताच विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात 250 सामने पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा कोहली जगातील केवळ चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी एमएस धोनी (263), रोहित शर्मा (256) आणि दिनेश कार्तिक (255) यांनी आयपीएलच्या इतिहासात 250 किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत.

संबंधित बातम्या:

IPL 2024: 'तुम्हाला 400 कोटी रुपये मिळाले तर...', केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात, लखनौच्या मालकाला खडसावले!

ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!

चेन्नईने सामना गमावला, पण सर्वांना चीअरलीडरची पडली भुरळ; अभिनेत्रींना टक्कर देणारं सौंदर्य, पाहा Photo's

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: शिंदेंच्या सेनेशी युती नकोच, ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
Sarita Kaushik On Parth Pawar:  पार्थ प्रकरणात अजित पवारांनी हात झटकले? सरिता कौशिक यांची संपादकीय भुमिका
Parth Pawar Land Case : जास्त दिवस वाचणार नाहीत', अजित पवारांवरील आरोपांवरून जनता संतप्त
Parth Pawar Land Scam: पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोपा, सारथी कोण?
Jarange Death Threat: 'खूप मोठं षडयंत्र, नावानिशी मांडतो', मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget