IPL 2024 Hardik Pandya: 'मुंबई इंडियन्स जिंकू दे अथवा हरु दे...'; भारतीय संघाच्या माजी खेळाडूने केलं हार्दिक पांड्याचं कौतुक
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हीड, इशान किशन, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह हे खेळाडू असताना देखील मुंबईने 11 पैकी 8 सामने गमावले.
IPL 2024 KKR vs MI: कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा (MI) 24 धावांनी पराभव केला आहे. कोलकाताला 19.5 षटकांत 169 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर मुंबईचा डाव 18.5 षटकांत 145 धावांत संपुष्टात आला. कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघात अनेक चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हीड, इशान किशन, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह हे खेळाडू असताना देखील मुंबईने 11 पैकी 8 सामने गमावले. मुंबईच्या या कामगिरीवरुन अनेक माजी खेळाडूंनी हार्दिकच्या कर्णधारपदावरुन प्रश्न उपस्थित केले. तसेच मुंबईच्या संघात गटबाजी असल्याने संघात संतुलन नसल्याचा दावा करण्यात येत आहे. याचदरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू मनोज तिवारी याने हार्दिक पांड्याचं कौतुक केलं आहे.
मुंबईचा कोलकाताविरुद्ध पराभव झाल्यानंतर मनोज तिवारी ट्विट करत म्हणाला की, मुंबई इंडियन्स जिंकू दे... अथवा हरु दे...मला काही फरक पडत नाही. पण, हार्दिक पांड्या चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, हे भारतीय संघासाठी महत्वाचं आहे. कोलकाताविरुद्ध हार्दिक पांड्याने 2 विकेट्स घेतल्या. मात्र फलंदाजीत त्याला चांगली कामगिर करता आली नाही. हार्दिक फक्त एक धाव करत बाद झाला. याआधी झालेल्या लखनौविरुद्धच्या सामन्यात देखील हार्दिकने चांगली गोलंदाजी करत दोन विकेट्स पटकावल्या होत्या.
I don't care about whether Mumbai Indians win or lose, but it's a good sign that Hardik Pandya is bowling with good line and length, which is important for India in the #T20WorldCup2024.#MIvsKKR #KKRvMI #HardikPandya
— Manoj Tiwari (@ManojTiwariIND) May 4, 2024
pic.twitter.com/kHLMRCPfTG
मुंबई इंडियन्सचा पराभव-
केकेआरने पहिल्या खेळात 169 धावा केल्या होत्या, ज्यासाठी व्यंकटेश अय्यरने 70 धावांची शानदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरली तेव्हा संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघाने 46 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. रोहित शर्मा 11 धावा, इशान किशन 13 आणि नमन धीर 11 धावाच करू शकला. सूर्यकुमार यादव खंबीरपणे उभा राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट पडत होत्या. सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 56 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकारही लगावले.
संबंधित बातम्या:
मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरची चर्चा; वानखेडे मैदानावरील फोटो होतोय व्हायरल