IPL 2024: लखनौने देवदत्त पडिकलला केले ट्रेड, स्टार गोलंदाजाचे बलिदान
LSG And RR : आयपीएल 2024 च्या लिलावाआधी ट्रेडिंग विंडो सुरु झाली आहे. आयपीएलचे संघ खेळाडूंना ट्रेड करत आहेत. आज लखनौ सुपर जायंट्स संघाने राजस्थानसोबत ट्रेड केले.
LSG And RR : आयपीएल 2024 च्या लिलावाआधी ट्रेडिंग विंडो सुरु झाली आहे. आयपीएलचे संघ खेळाडूंना ट्रेड करत आहेत. आज लखनौ सुपर जायंट्स संघाने राजस्थानसोबत ट्रेड केले. लखनौने देवत्त पडिकल याला ट्रेड केलेय. पण त्यांनी स्टार गोलंदाज आवेश खान याला गमावले आहे. आता आवेश खान राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य असेल. राजस्थान संघाने आवेश खान याला घेत पडिकल लखनौच्या ताफ्यात दिलेय.
आता आगामी हंगामात लखनौच्या संघाला या ट्रेडचा कितपत फायदा होतो किंवा त्यामुळे त्यांचे नुकसान होणार आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पडिकलसाठी 2023 चे आयपीएल काही खास नव्हते. त्याने स्पर्धेतील 11 सामन्यात फक्त 26.10 च्या सरासरीने आणि 130.50 च्या स्ट्राईक रेटने 261 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतकं निघाली होती. त्यामुळे राजस्थान रॉयल्सनेही त्याला सोडण्याचा निर्णय घेतला.पडकीलसाठी आयपीएल 2022 हा हंगाम आणखी वाईट होता, ज्यामध्ये त्याने 17 सामन्यात केवळ 22.11 च्या सरासरीने आणि 122.86 च्या सरासरीने 376 धावा केल्या. राजस्थानने 2023 मध्ये पडिकलला 7.75 कोटी रुपयांना कायम ठेवले होते.
दुसरीकडे आवेश खान याने 2023 आयपीएलमध्ये लखनौसाठी 9 सामन्यात आठ विकेट घेतल्या होत्या. तो महागडाही ठरला होता. आवेश खान याने 9.75 प्रति षटक धावा लुटल्या होत्या. 2022 आयपीएल हंगाम आवेश खानसाठी शानदार गेला होता. त्याने 13 सामन्या 18 विकेट घेतल्या होत्या. त्याने प्रति षटक 8.72 धावा खर्च केल्या होत्या. आवेश खानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचाही अनुभव आहे. तो भारतासाठी एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅट खेळतो. त्याने आतापर्यंत 5 एकदिवसीय आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अशा स्थितीत स्पर्धेच्या पुढील मोसमात आवेश खानचा राजस्थान रॉयल्सला फायदा होऊ शकतो. आता आवेश राजस्थानसाठी काय करू शकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
🚨 NEWS 🚨:
— IndianPremierLeague (@IPL) November 22, 2023
Avesh Khan traded to Rajasthan Royals, Devdutt Padikkal traded to Lucknow Super Giants. #IPL
More Details 🔽https://t.co/SN9w3zvmkJ
दिल्लीने दोन जणांची साथ सोडली -
2024 आयपीएलसाठी दिल्ली संघाने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीने सरफराज खान आणि मनिष पांडे यांना रिलिज करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2023 मध्ये या दोन्ही खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे दिल्लीने त्यांना रिलिज कऱण्याचा निर्णय घेतला आहे.
Delhi Capitals has released Manish Pandey & Sarfaraz Khan ahead of IPL 2024 auction. [PTI] pic.twitter.com/Lwr8Puo6Dr
— Johns. (@CricCrazyJohns) November 22, 2023