(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kuldeep Yadav : कुलदीपचा बॉल पूरनला कळलाच नाही, थेट स्टम्पवर आदळला, आला तसा पॅव्हेलियनमध्ये माघारी पाठवला
Kuldeep Yadav LSG vs DC: कुलदीप यादवनं लखनौ सुपर जाएंट्सच्या विरुद्ध तीन विकेट घेतल्या. त्यानं स्टॉयनिस, पूरन आणि राहुलला बाद केलं.
Kuldeep Yadav LSG vs DC लखनौ : दिल्ली कॅपिटल्सनं आज यंदाच्या आयपीएलमध्ये दुसरा विजय मिळवला. दिल्लीसाठी खलील अहमद आणि कुलदीप यादवची बॉलिंग महत्त्वाची ठरली. खलीलनं 2 तर कुलदीपनं तीन विकेट घेतल्या. यामुळं लखनौला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कुलदीप यादवनं चांगली कामगिरी करत शानदार बॉलिंग केली. लखनौ सुपर जाएंटसचे प्रमुख तीन खेळाडून कुलदीपनं बाद केले.दिल्ली कॅपिटल्स साठी कुलदीपनं चांगली कामगिरी केली. कुलदीपने लखनौचा कॅप्टनं केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरनची विकेट घेतली. कुलदीप आणि खलीलच्या बॉलिंगमुळं अशी वेळ आली होती की लखनौच्या 7 बाद 94 धावा अशी स्थिती झाली होती. कुलदीपनं लखनौ विरुद्ध 4 ओव्हर्समध्ये 20 धावा देत 3 विकेट घेतल्या.
दिल्लीकडून आठव्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याची संधी रिषभ पंतनं कुलदीप यादवला दिली. त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये स्टॉयनिसची विकेट घेतली. स्टॉयनिसनं 10 बॉलमध्ये 8 धावा केल्या. यानंतर निकोलस पूरन फलंदाजीसाठी आला त्याला पहिल्याच बॉलवर कुलदीपनं माघारी पाठवलं. कुलदीपनं टाकलेला बॉल थेट स्टम्पवर जाऊन आदळला. कुलदीप यादवनं तिसरी विकेट कॅप्टन केएल. राहुलची घेतली. त्यानं 22 बॉलवर 39 धावा केल्या.
कुलदीप यादवची आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिली आहे. त्यानं आतापर्यंत 76 मॅचमध्ये 77 विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 14 रन देत 4 विकेट अशी आहे. कुलदीप यादवनं अनेकदा घातक गोलंदाजी करुन फलंदाजांना बाद केलं आहे. कुलदीप यादवनं यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब विरुद्ध चांगली कामगिरी केल ीहोती. त्यानं 20 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या.
𝗪𝗔𝗧𝗖𝗛 𝗢𝗡 𝗟𝗢𝗢𝗣! 🔄 😍
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2024
Kuldeep Yadav straight away unveiling his magic!👌👌
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #LSGvDC | @imkuldeep18 pic.twitter.com/pzfIQYpqnA
दिल्लीचा दुसरा विजय
रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्सनं यंदाच्या आयपीएलमधील दुसरा विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सनं यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं होतं. दिल्लीनं दोन विजयांसह आता चार गुण मिळवले आहेत. दिल्लीच्या विजयात फ्रेजर मैक्गर्क, रिषभ पंत, पृथ्वी शॉ यांची फलंदाजी महत्त्वाची ठरली. दरम्यान, लखनौनं दिल्लीपुढं विजयासाठी 167 धावा केल्या होत्या. दिल्लीनं सहा विकेटनं ही मॅच जिंकली. लखनौच्या आयुष बदोनीनं 35 बॉलमध्ये 55 धावा केल्या. अरशद खाननं 20 धावा केल्या.
दरम्यान, गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स आता नवव्या स्थानावर पोहोचलं आहे. तर आरसीबीची दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.
संबंधित बातम्या :
Virat Kohli : विराट कोहलीला कॅप्टन करा तरच आरसीबी लढेल आणि जिंकेल, माजी क्रिकेटपटूची मोठी मागणी