(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rishabh Pant DRS : रिषभ पंत पुन्हा एकदा चुकला, पंचांबरोबर वाद घालू लागला, डीआरएसवरुन मैदानावर राडा
DC vs LSG : दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यात 26 वी मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये रिषभ पंतनं डीआरएसवरुन पंचांसोबत वाद घातला.
लखनौ : आयपीएल 2024 (IPL 2024) च्या 17 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals)कॅप्टन रिषभ पंत (Rishabh Pant) डीआरएसच्या निर्णयासंदर्भात सातत्यानं चर्चेत राहिला आहे. यापूर्वीच्या मॅचमध्ये कुलदीप यादवनं रिषभ पंतला जबरदस्ती डीआरएस घ्यायला लावला होता. आजच्या मॅचमध्ये रिषभ पंतचा डीआरएसच्या निर्णयावरुन पंचांसोबत वाद झाल्याचं पाहायला मिळालं. रिषभ पंतनं या सगळ्यात एक डीआरएस गमावला याचा फटका पुढं दिल्ली कॅपिटल्स बसला आहे. डीआरएस घेण्यासंदर्भात रिषभ पंतनं अंपायर सोबत वाद घातल्याचं पाहायला मिळालं. रिषभ पंत सुरुवातीला त्याच्याकडून घडलेली चूक मान्य करायला तयार नव्हता, अखेर रिप्लाय दाखवण्यात आला यानंतर रिषभ पंतला माघार घ्यावी लागली.
मैदानावर नेमकं काय घडलं?
लखनौ सुपर जाएंटसनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीकडून डावाची चौथी ओव्हर इशांत शर्मा टाकत होता.यावेळी इशांत शर्मानं टाकलेला एक बॉल पंचांनी वाईड दिला होता. इशांत शर्मानं पहिल्या तीन बॉलमध्ये एक बॉल वाईड टाकला होता. त्यांन चौथा बॉल देखील वाईड टाकला होता. यावेळी रिषभ पंतनं या दरम्यान संघातील खेळाडूंकडे डीआरएस संदर्भात इशारा केला. पंतनं यावेळी मात्र डीआरएस ज्या पद्धतीनं घेतला जातो, तशा प्रकारे इशारा केला होता. त्यामुळं पंचांनी डीआरएस घेतला. यामुळं वादाला सुरुवात झाली.
पंचांनी रिषभ पंतांचा इशारा पाहून थर्ड अंम्पायरकडे निर्णय रेफर केला. यानंतर त्यामध्ये तो बॉल वाईड असल्याचं स्पष्ट झालं आणि दिल्लीनं त्यांचा बहुमोल डीआरएस गमावला. यानंतर वादाला सुरुवात झाली. रिषभ पंत यानंतर पंचांजवळ गेला आणि त्यानं सांगितलं की आम्हाला डीआरएस घ्यायचा नव्हता. पंचांकडून इशारा समजण्यात गैरसमज झाल्याची भूमिक रिषभ पंतनं घेतली. बराचवेळ रिषभ पंत आणि पंचांमध्ये वाद सुरु होता. रिषभ पंत त्यांच्या दाव्यावर ठाम होता. यानंतर रिप्ले पाहण्यात आला त्यात मात्र रिषभ पंतनं डीआरएसचा इशारा केल्याचं दिसून आलं. यानंतर रिषभ पंत नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
कुलदीप यादव खलील अहमदनं लखनौला रोखलं पण बदोनीनं पलटवला
कुलदीप यादवनं लखनौ सुपर जाएंटसच्या तीन विकेट घेतल्या. दुसरीकडे खलील अहमदनं देखील दोन विकेट घेतल्या. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं लखनौला रोखलं होतं. मात्र, त्यानंतर आयुष बदोनी आणि अरशद खान या दोघांच्या फलंदाजीमुळं लखनौ कॅपिटल्सनं 7 विकेटवर 167 धावा केल्या.
संबंधित बातम्या :
Virat Kohli : विराट कोहलीला कॅप्टन करा तरच आरसीबी लढेल आणि जिंकेल, माजी क्रिकेटपटूची मोठी मागणी