(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Impact Player: पुढील आयपीएलपूर्वी इम्पॅक्ट प्लेअर रद्द होणार? दिग्गजांचे नियमावर सवाल, वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची बैठक
Impact Player Rule: आयपीएलच्या 2025 च्या पर्वात इम्पॅक्ट प्लेअर नियम रद्द होऊ शकतो. इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत दिग्गजांनी आवाज उठवल होता.
Jay Shah On Impact Player Rule चेन्नई : आयपीएलच्या 17 व्या पर्वातील अखेरची मॅच चेन्नईमध्ये होत आहे. अंतिम फेरीच्या (IPL Final) लढतीत सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमने सामने आले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम सर्वाधिक चर्चेत राहिला. इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळं (Impact Player) ऑलराऊंडर खेळाडूंवर अन्याय होत असल्याचं रोहित शर्मा, झहीर खान यांच्यासह अनेकांनी म्हटलं. तर विराट कोहलीनं देखील इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत भाष्य केलं होतं. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देखील यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं होतं.
आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत दिग्गजांनी आक्षेप घेतल्यानंतर 2025 च्या आयपीएल स्पर्धेत तो नियम रद्द केला जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'इम्पॅक्ट प्लेअर' नियमाबाबत काही प्रशिक्षक आणि खेळाडूंनी आक्षेप घेतला होता. हा नियम गोलंदाजांसाठी चांगला नसल्याचं म्हटलं होतं. या नियमामुळं यंदाच्या आयपीएलमध्ये अनेकदा 250 धावांपेक्षा अधिक धावसंख्या झाल्याचा दावा केला गेला. रोहित शर्मानं या नियमामुळं ऑल राऊंडर्सला संधी मिळत नसल्याचं म्हटलं होतं. मुंबई इंडियन्सनं अखेरच्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी दिली होती.
जय शाह काय इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत काय म्हणाले?
जय शाह यांनी इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत बोलताना म्हटलं की हा नियम फक्त प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आला होता. या नियमावर टी-20 वर्ल्ड कपनंतर सर्वांशी चर्चा करु, असं जय शाह यांनी म्हटलं.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी इम्पॅक्ट प्लेअर नियम प्रायोगिक तत्वावर आणला होता. यामुळं दोन भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. जय शाह यांनी टी-20 वर्ल्ड कप झाल्यानंतर चर्चा करु म्हटलं होतं.
जय शाह यांनी जर खेळाडूंना इम्पॅक्ट प्लेअर नियम योग्य वाटत नसेल तर आम्ही यावर चर्चा करु अस म्हटलं. आतापर्यंत कुणी काही केलेलं नाही. आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपनंतर बैठक घेऊन चर्चा करुन निर्णय घेऊ, असं जय शाह म्हणाले होते.
वर्ल्ड कपनंतर टीम, खेळाडू आणि प्रक्षेपकांच्यासोबत चर्चा करुन इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत चर्चा करु, असं जय शाह म्हणाले होते. हा नियम कायमस्वरुपी नसून तो रद्द करण्यात येईल असंही म्हटलेलं नसल्याचं जय शाह म्हणाले.
दरम्यान, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि इतर संघांनी इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा प्रभावीपणे वापर करुन घेतला होता.
संबंधित बातम्या :