फक्त हार्दिक पांड्याकडे चषक, यंदाच्या आयपीएल हंगामातील 9 कर्णधारांकडे जेतेपदाचा अनुभवच नाही
IPL 2024 : आयपीएल 2024 या हंगामात अनेक बदल झाले आहेत. कोणत्या संघाचा कोच बदलला, तर कोणत्या संघाला नवा मेंटोर मिळाला. यावेळी एमएस धोनी आणि रोहित शर्मा कर्णधारपद संभाळणार नाहीत.
IPL 2024 : आयपीएल 2024 या हंगामात अनेक बदल झाले आहेत. कोणत्या संघाचा कोच बदलला, तर कोणत्या संघाला नवा मेंटोर मिळाला. यावेळी एमएस धोनी आणि रोहित शर्मा कर्णधारपद संभाळणार नाहीत. त्याशिवाय हैदराबादचेही नेतृत्व बदललं आहे. दिल्लीमध्ये ऋषभ पंत पुन्हा परतलाय. तर श्रेयस अय्यर कोलकात्याची धुरा संभाळणार आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड संभाळणार आहे. दुसरीकडे रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन हाकालपट्टी करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा दिली आहे. यंदाच्या हंगामातील दहा कर्णधारामध्ये फक्त हार्दिक पांड्याकडे चषक जिंकण्याचा अनुभव आहे. हार्दिक पांड्यानं गुजरातचा कर्णधार असताना चषकावर नाव कोरलं आहे. उर्वरित 9 कर्णधारांना एकदाही चषक जिंकता आलेला नाही.
IPL 2024 मध्ये तीन खेळाडू पहिल्यांदाच करणार नेतृत्व -
IPL 2024 च्या हंगामात तीन खेळाडू आपल्या संघाचं पहिल्यांदाच नेतृत्व करणार आहेत. यामध्ये ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल आणि पॅट कमिन्स यांचा समावेश आहे. उर्वरित सात कर्णधारांनी याआधी आयपीएलमध्ये नेतृत्व केले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात अनुभवी कर्णधार श्रेयस अय्यर हा आहे. त्यानं आतापर्यंत 55 आयपीएल सामन्यात नेतृत्व केलेय. तर दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. राहुल लखनौची धुरा संभाळणार आहे. त्याआधी पंजाबचाही कर्णधार राहिला. केएल राहुलनं आयपीएलमध्ये 51 सामन्यात कर्णधारपद संभाळलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसनचा क्रमांक लागतो. संजूने आयपीएलमध्ये 45 सामन्यात कर्णधारपद संभाळलं आहे.
हार्दिक पांड्याकडे फक्त चषक -
आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 10 कर्णधारांपैकी फक्त हार्दिक पांड्यानं कर्णधार असताना चषक जिंकला आहे. हार्दिक पांड्याने 2022 मध्ये गुजरातला चषक जिंकून दिला होता. त्यावेळी तो संघाचा कर्णधार होता. अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरातनं राजस्थानचा सात विकेटने पराभव केला होता. हार्दिक पांड्याने आतापर्यंत 31 सामन्यात नेतृत्व केले आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने आतापर्यंत 30 सामन्यात नेतृत्व केले आहे. 2022 पासून आरसीबीचं नेतृत्व संभाळणाऱ्या फाफने आतापर्यंत 27 सामन्यात नेतृत्व संभाळलं आहे. त्याशिवाय शिखर धवनही पंजाबची धुरा संभाळणार आहे. धवनलाही आतापर्यंत चषक उंचावता आला नाही.
फाफ डु प्लेसिस सर्वात वयोवृद्ध कर्णधार -
आयपीएलमधील दहा कर्णधारांमध्ये फाफचं वय सर्वाधिक आहे. फाफ डु प्लेसिस 39 वर्षांचा आहे. फाफ आरसीबीचं नेतृत्व संभाळणार आहे. या यादीमध्ये शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 38 वर्षीय धवन पंजाबचं नेतृत्व करतोय. ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल सर्वात युवा कर्णधार आहेत.