IPL 2024: मुंबई, पंजाबनंतर गुजरातही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघाचे चमकले नशीब, क्वालिफायर 1 साठी ठरला पात्र
IPL 2024 GT vs KKR: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आधीच स्पर्धेच्या पुढील फेरीत जाण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले होते.
IPL 2024 GT vs KKR: गुजरात टायटन्सच्या (GT) चाहत्यांसाठी काल निराशाजनक दिवस होता. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धचा (KKR) सामना पावसामुळे होऊ शकला नाही. नाणेफेक न होता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिले गेले. पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर गुजरातच्या प्ले ऑफच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आल्या.
आयपीएल 2024 च्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या संघांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आधीच स्पर्धेच्या पुढील फेरीत जाण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. सोमवारी कोलकाता नाइट रायडर्ससोबतचा सामना रद्द झाल्यामुळे गुजरात टायटन्सही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाला. तर केकेआर चे 19 गुण झाले आहेत आणि राजस्थान रॉयल्स वगळता अन्य कोणताही संघ एवढ्या गुणांपर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे केकेआर क्वालिफायर 1 साठी पात्र ठरला आहे.
कोलकाताला फायदा झाला
गुजरातविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे 1 गुण मिळाल्यानंतर कोलकाता संघ टॉप 2 मध्ये स्थान मिळवेल हे निश्चित आहे. यासह हे निश्चित झाले की गुणतालिकेत इतर शीर्ष 2 संघ कोणीही असला तरी, कोलकाता संघ निश्चितपणे प्लेऑफ पात्रता खेळेल. क्वालिफायरमध्ये खेळणाऱ्या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी मिळतात. जर संघ पात्रता फेरीत पराभव झाला तर त्याला विजयी संघासोबत एलिमिनेटरमध्ये खेळण्याची संधी दिली जाते. जे जिंकून संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल.
Rain affects @gujarat_titans' last home game this season 🌧️
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2024
They thank their fans at the Narendra Modi International Stadium, Ahmedabad 🏟️ 🙌#TATAIPL | #GTvKKR pic.twitter.com/28Z11tjxQ4
गुजरातचं आव्हान संपलं -
सोमवारी गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सामना सुरु झाल्यानंतरही पावसाने जोरदार हजेरी लावली. काहीवेळासाठी पावसाने विश्रांती घेतली. ग्राऊंड स्टाफने मैदान सुखावण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. गुजरातचं आव्हान संपुष्टात आलेय. गुजरातचे आता 13 सामन्यात 11 गुण झाले आहेत. यंदाच्या हंगामातील गुजरातचा अखेरचा सामना हैदराबादविरोधात होणार आहे. हा सामना जिंकून गुजरातचा संघ शेवट गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे.