IPL 2023: 'थँक गॉड... उर्वशी नाही आली', दिल्लीच्या सामन्यात पोस्टर व्हायरल, अभिनेत्री म्हणाली...
दिल्लीला सपोर्ट करण्यासाठी मंगळवारी ऋषभ पंत अरुण जेटली स्टेडिअमवर आला होता. पण चाहत्याच्या एका पोस्टरमुळे उर्वशी आणि ऋषभ पंत यांची पुन्हा चर्चा सुरु झाली.
Urvashi Rautela On Rishabh Pant : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर गुजरातने दिल्लीचा पराभव केला. गुजरातने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली तर दिल्लीचा सलग दुसरा पराभव झाला. पण या सामन्याला दिल्लीच्या संघाचे मनोबल वाढवण्यासाठी ऋषभ पंत याने (Rishabh Pant) हजेरी लावली होती. दुखापतीमुळे ऋषभ पंत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला मुकला आहे. तो पुढील सात ते आठ महिने मैदानावर पुनरागमन करु शकत नाही. अशात दिल्ली संघाला सपोर्ट करण्यासाठी मंगळवारी ऋषभ पंत अरुण जेटली स्टेडिअमवर आला होता. पण चाहत्याच्या एका पोस्टरमुळे उर्वशी आणि ऋषभ पंत यांची पुन्हा चर्चा सुरु झाली.
'थँक गॉड... उर्वशी सामना पाहायला आली नाही'
दिल्ली आणि गुजरात या सामन्यादरम्यान टिव्हीवर झळकलेले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालेय. या पोस्टरची जोरदार चर्चा आहे. या व्हायरल पोस्टरवर चाहत्याने उर्वशीसाठी खास मेसेज लिहिला होता. 'थँक गॉड... उर्वशी सामना पाहायला आली नाही' असा मेसेज असलेला पोस्टर चाहता घेऊन स्टेडिअवर पोहचला होता. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालेय. उर्वशीनेही याचा स्क्रीनशॉन घेऊन आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेय. त्याशिवाय असे का? असा प्रश्न उर्विशीने विचारला आहे. उर्वशीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर पंत आणि उर्वशी यांची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
उर्वशी रौतेलाची पोस्ट व्हायरल -
उर्वशी रौतेलाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केलाय. एका नेटकऱ्यांनी म्हटलेय की, पंतला नजर लागली असती. तर अन्य एका युजर्सने लिहेल की, उर्वसी स्वतलाच ट्रोल करत आहे. याशिवाय अनेक युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर उर्वशीची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय आहे. तासभरातच उर्वशीच्या पोस्टला दोन लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
हिल्या सामन्यात पंतसाठी दिल्लीने केली खास गोस्ट -
दुखापतीमुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलला मुकला आहे. पंतशिवाय दिल्लीचा संघ मैदानात उतरला आहे. दिल्लीची धुरा डेविड वॉर्नरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पंतची कमी दिल्लीच्या संघाला नक्कीच जाणवत असेल, यात शंका नाही. 2022 डिसेंबरमध्ये पंतचा भीषण अपघात झाला होता, त्यानंतर त्याच्यावर सर्जरी झाली. पंत पुढील काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. पंत आयपीएलमध्ये खेळत नसला तरी त्याच्यासाठी दिल्लीच्या संघाने खास गोष्ट केली. आयपीएलच्या यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने पंतसाठी डगआऊटमध्ये जर्सी ठेवली आहे. त्याच्या नावाची जर्सी डगआऊटमध्ये ठेवण्यात आली आहे. पंत सामन्यात नसला तरी तो संघासोबत आहे, असा संदेश दिल्लीच्या संघाला द्यायचा असेल.. पंतसाठी दिल्लीच्या संघाने केलेला हा आदर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता.