एक्स्प्लोर

आज आयपीएलच्या मैदानात राजस्थान रॉयल्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू भिडणार, कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन?

IPL 2023, RR vs RCB: आजच्या आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांशी भिडणार आहेत.

IPL 2023, RR vs RCB: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यातील 60 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाईल. जिथे संजू सॅमसन आणि फाफ डू प्लेसिस 16व्या सीझनमध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना आरसीबीनं जिंकला होता. तसेच, आरआर त्यांच्या पराभवाचा बदला घेणार आहे. 

राजस्थान विरुद्ध बंगळुरू हेड टू हेड 

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये राजस्थाननं 12 आणि बंगळुरूनं 14 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचा आजचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे, जिथे दोन्ही संघ आतापर्यंत 7 वेळा भिडले आहेत. या सामन्यांमध्ये राजस्थाननं 4 तर बंगळुरूनं 3 सामने जिंकले आहेत.

राजस्थान रॉयल्सनं सलग तीन पराभवानंतर गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध नऊ विकेट्सनी मोठा विजय मिळवला. ज्यामुळे टीम सध्या फॉर्मात आहे. या सामन्यात जायस्वालनं 47 चेंडूत नाबाद 98 धावा केल्या तर कर्णधार संजू सॅमसननं 48 धावांचं योगदान दिलं आहे. तर आरसीबीसाठी आजचा सामना खरंच करो या मरोच्या स्थितीप्रमाणेच असणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बंगळुरूला कोणत्याही किमतीत हा सामना जिंकावा लागेल. राजस्थान रॉयल्सचीही स्थिती काहीशी अशीच आहे. आरसीबी 11 सामन्यांत 10 गुणांवर आहे, तर रॉयल्स 12 सामन्यांत 12 गुण आहेत. आरसीबीसाठी आतापर्यंत फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखलं आहे, तर ग्लेन मॅक्सवेलही उत्तम फॉर्मात आहे. संघाला मात्र मधल्या फळीतील फलंदाज महिपाल लोमरोर, अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांच्या पाठिंब्याची गरज आहे.

राजस्थान आणि बंगळुरूचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन  

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ :

यशस्वी जायसवाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकिपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.

रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा संभाव्य संघ :

फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदु हसरंगा, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज. 

पॉईंट टेबलमध्ये दोन्ही संघ कोणत्या स्थानी? 

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पॉईंटटेबलमधील स्थितीबाबत बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या संघानं त्यांच्या 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. तसेच, RCB 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. बंगळुरूच्या संघानं 11 सामन्यांत 5 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. दुसरीकडे, जर आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. पण घरच्या मैदानावर आरआरला पराभूत करणं आरसीबीसाठी सोपं नसणार आहे, एवढं मात्र नक्की 

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
Manikrao Kokate and Ajit Pawar: माणिकराव कोकाटेंच मंत्रिपद दुसऱ्यांदा धोक्यात, अजित पवारांच्या भेटीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
माणिकराव कोकाटेंच मंत्रिपद दुसऱ्यांदा धोक्यात, अजित पवारांच्या भेटीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
Dhurandhar Box Office Collection Day 12: 'धुरंधर'नं सर्वांना धूळ चारली; 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं, 400 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री
'धुरंधर'नं सर्वांना धूळ चारली; 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं, 400 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
Embed widget