PBKS vs LSG Playing 11 : पंजाब आणि लखनौ आमने-सामने, कोण ठरणार वरचढ? नवाबांविरुद्ध उतरणार 'हे' 11 किंग्स
PBKS vs LSG, IPL 2023 Match 37 : आज मोहालीतील स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगणार आहे.
Punjab Kings vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) आज, 28 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगणार आहे. पंजाबच्या घरच्या मैदानावर मोहालीमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. मोहातीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमची (Punjab Cricket Association Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
PBKS vs LSG, IPL 2023 Match 37 : पंजाब आणि लखनौ आमने-सामने
मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळविल्यानंतर, पंजाब किंग्स (PBKS) आज आयपीएल 2023 मधील 38 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध मैदानात उतरणार आहे. आतापर्यंत लखनौ आणि पंजाब दोन्ही संघाने प्रत्येकी सात सामने खेळले असून चार सामन्यांत विजय मिळवला आहे. लखनौ संघाला मागील सामन्यांत गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
PBKS vs LSG, IPL 2023 Match 37 : कोण ठरणार वरचढ?
आयपीएल गुणतालिकेत लखनौ सुपर जायंट्स संघ चौथ्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने 7 पैकी चार सामन्यात विजय मिळवला असून संघाकडे 8 गुण आणि 0.547 नेट रनरेट आहे. पंजाब किंग्स संघ सहाव्या सातव्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्स संघ 7 पैकी 4 सामन्यात विजयानंतर 8 गुण आणि -0.162 नेट रनरेटसह सहाव्या क्रमांकावर आहे.
Mohali Pitch Report : मोहालीची खेळपट्टी कशी आहे?
मोहालीतील (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमची (Punjab Cricket Association Stadium) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला.
PBKS vs LSG, Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
PBKS Probable Playing 11 : पंजाब संभाव्य प्लेईंग 11
अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंह, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत सिंह भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंह.
LSG Probable Playing 11 : लखनौ संभाव्य प्लेईंग 11
केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आवेश खान, रवी बिश्नोई, अमित मिश्रा, नवीन-उल-हक.
महत्त्वाच्या इतर बातम्या :