एक्स्प्लोर

SRH vs PBKS 1st Innings Highlights: शिखर धवनची नाबाद 99 धावांची खेळी, पंजाबची 143 धावांपर्यंत मजल

IPL 2023 SRH vs PBKS:  हैदराबादच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबची फलंदाजी ढासळली. पण कर्णधार शिखर धवन याने एकाकी झुंज देत पंजाबची नामुष्की टाळली.

IPL 2023 SRH vs PBKS:  हैदराबादच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबची फलंदाजी ढासळली. पण कर्णधार शिखर धवन याने एकाकी झुंज देत पंजाबची नामुष्की टाळली. शिखर धवन याने नाबाद 99 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. शिखर धवनच्या 99 धावांच्या खेळीच्या बळावर पंजाबने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 143 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून मयांक मार्केंडेय याने चार विकेट घेतल्या. हैदराबादला विजयासाठी 144 धावांची गरज आहे.

शिखर धवनची एकाकी झुंज - 

एकीकडे विकेट पडत असताना शिखर धवन याने संयमी फलंदाजी केली. धवन याने अखेरपर्यंत किल्ला लडवला. धवनच्या नाबाद 99 धावांच्या खेळीमुळे पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. शिखर धवन याने 66 चेंडूत 99 धावांची खेळी केली. यामध्ये पाच षटकार आणि 12 चौकारांचा समावेश आहे. 

पंजाबची फंलदाजी ढासळली - 

हैदराबादच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबची फलंदाजी ढासळली. शिखर धवनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. भन्नाट फॉर्मात असलेला प्रभसिमरन याला खातेही उघडता आले नाही. तो गोल्डन डकचा शिकार झाला... त्याला भुवनेश्वर कुमार याने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर पंजाबकडून पहिला सामना खेळणाऱ्या मॅथ्यू शॉर्ट याचा अडथळा मार्को जानसन याने दूर केला. मॅथ्यू शॉर्ट फक्त एका धावावर तंबूत परतला. त्यानंतर जितेश शर्माही चमकदार कामगिरी करु शकला नाही. जितेश शर्मा चार धावावर मार्को जानसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. सॅम करन याने चांगल्या सुरुवातीनंतर विकेट फेकली. सॅम करन याने 15 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. सॅम करन मयांक मार्केंडेयचा शिकार झाला. सिंकदर राजा याला उमरान मलिक याने तंबूत पाठवले. सिंकदर रजा पाच धावांचे योगदान देऊ शकला. शाहरुख खान याला मयांक मार्केंडेय याने बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. शाहरुख खान फक्त चार धावांवर बाद झाला. त्यानंतर हरप्रीत ब्रार उमरानच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. हरप्रीतला एक धाव काढता आली. नॅथन इलीस आणि राहुल चहर एकही धाव न काढता तंबूत परतले. 

हैदराबादची भेदक गोलंदाजी - 

हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून पंजाबच्या फलंदाजांची शिकार केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत एकापाठोपाठ एका फलंदाजांना त्यांनी तंबूत पाठवले. मयांक मार्केंडेय याने चार षटकात 15 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. हैदराबादकडून तो सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला. त्याशिवाय उमरान मलिक याने दोन विकेट घेतल्या. भुवनेशव्र कुमार याने एक विकेट घेतली. तर मार्को जानसन याला दोन विकेट मिळाल्या. वॉशिंगटन सूंदर याला एकही विकेट मिळाली नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget