Nana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडले
Nana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आई मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी आज पहाटे नागपूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्यावर भंडाऱ्याच्या सुकळी या स्वगावी चुलबंद नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आला. आपल्या आईचं अंतिम दर्शन घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गहिवरले. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी आईला अखेरचा निरोप दिला. यावेळी नाना पटोले यांचे मोठे बंधू विनोद पटोले आणि पटोले कुटुंबांसह उपस्थित आप्तस्वकीयांचेही डोळे पानावल्याचं चित्र बघायला मिळाला. *अंत्यविधीसाठी नाना पटोले यांचे राजकीय हाडवैर असलेले भाजप नेते आमदार परिणय फुके, नाना पटोले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढणारे भाजपचे अविनाश ब्राह्मणकर* यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ता आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.