IPL 2023 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर, पर्पल कॅपवर सिराजचा कब्जा; पाहा टॉप 5 खेळाडूंची यादी
IPL 2023 Orange and Purple Cap : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये ऑरेंज कॅप (Orange Cap) सध्या फाफ डु प्लेसिसकडे तर, पर्पल कॅप (Purple Cap) मोहम्मद सिराजकडे आहे.
IPL 2023 Orange Cap and Purple Cap : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आरसीबीने कोलकाता नाइट रायडर्सकडून सामना गमावल्यानंतरही सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आरसीबीचा स्टार फलंदाज अव्वल स्थानावर आहे. फाफ डु प्लेसिस (Faf Du Plessis) ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. फाफ डू प्लेसिस यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. डु प्लेसिसने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांमध्ये एकूण 422 धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या ऑरेंज कॅप डु प्लेसिसकडे आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, डु प्लेसिसच्या (Faf Du Plessis) बरगडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ त्याला फलंदाजी दरम्यान इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवत आहेत. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या जागी विजयकुमार विशाखला खेळवण्यात येत आहे. तर त्याच्याऐवजी विराट कोहली (Virat Kohli) आरसीबीचं नेतृत्व करत आहे. दुखापतीसोबत झुंज देत खेळत असतानाही डु प्लेसिसची बॅट तळपताना दिसत आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत डेवॉन कॉनवे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सात सामन्यांमध्ये 314 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने सात सामन्यांमध्ये 306 धावा केल्या आहेत. व्यंकटेश अय्यर पाचव्या क्रमांकावर असून त्याने 8 सामन्यांमध्ये 285 धावा केल्या आहेत.
And CAPPING off incredible performances…
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 20, 2023
Ladies & gentlemen, the Purple and the Orange cap holders 🟣🤝🟠#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #PBKSvRCB | @mdsirajofficial @faf1307 pic.twitter.com/JtBT3ffV9H
क्र. | टॉप 5 फलंदाज | धावा |
1. | फाफ डु प्लेसिस | 422 |
2. | विराट कोहली | 333 |
3. | डेवॉन कॉनवे | 314 |
4. | डेव्हिड वॉर्नर | 306 |
5. | व्यंकटेश अय्यर | 285 |
IPL 2023 Purple Cap : पर्पल कॅप
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील (Royal Challengers Bangalore) गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) राशिद खानकडून (Rashid Khan) पर्पल कॅप (Purple Cap) हिसकावून घेतली होती. तो सर्वाधिक 14 विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल आहे. अर्शदीप सध्या पर्पल कॅपचा (IPL 2023 Purple Cap) मानकरी आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राशिद खान (Rashid Khan) आहे. दरम्यान सिराज आणि राशिद या दोघांनीही 14 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्स संघातील अर्शदीप सिंह आहे. त्याने 13 विकेट घेतल्या आहेत.
क्र. | टॉप 5 गोलंदाज | विकेट |
1. | मोहम्मद सिराज | 14 |
2. | राशिद खान | 14 |
3. | अर्शदीप सिंह | 13 |
4. | वरुण चक्रवर्ती | 13 |
5. | तुषार देशपांडे | 12 |
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 Points Table : चेन्नईचा पराभव करून राजस्थान पुन्हा अव्वल, धोनीच्या संघाला नुकसान