एक्स्प्लोर

IPL 2023, Rohit Sharma : 'बुमराहशिवाय...', RCB कडून पराभवानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया, म्हणाला...

MI vs RCB, IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मानं बुमराहबाबत (Jasprit Bumrah) मोठं वक्तव्य केलं आहे.

Rohit Sharma on Bumrah and Mumbai Indians : आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करत दमदार विजय मिळवला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी (2 एप्रिल) झालेला मुंबई (MI) विरोधातील सामना आरसीबीने (RCB) आठ विकेट्सने जिंकला. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहिश शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात मुंबईने 20 षटकांत सात विकेट गमावत 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने 16.2 षटकांत दोन गडी गमावून 172 धावा करून सामना जिंकला.

IPL 2023, MI vs RCB : मुंबईच्या गोलंदाजांना बंगळुरुनं पछाडलं

मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही फोल ठरली. मुंबईतील दिग्गज खेळाडूंना चांगली खेळी करता आलेली नाही. तर गोलंदाजांनाही बंगळुरुने पछाडलं. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मानं बुमराहबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

IPL 2023, RCB vs MI : बुमराहबाबत काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा

आरसीबीकडून झालेल्या पराभवानंतर सामन्यानंतरच्या मुलाखतीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ''गेल्या सहा-आठ महिन्यांत मला जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्याची सवय झाली आहे. अर्थात हा वेगळा सेटअप आहे पण कोणीतरी पुढे येणं आवश्यक आहे. हे असंच चालू ठेवता येणार नाही. दुखापत आमच्या नियंत्रणात नाही, आम्ही त्याबद्दल फार काही करू शकत नाही. संघातील इतर खेळाडूही खूप प्रतिभावान आहेत. आपण त्यांना तो आधार द्यायला हवा. मोसमातील हा पहिलाच सामना होता आगामी सामन्यांसाठी उत्सुकता आहे.''

IPL 2023, MI vs RCB : बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अनेक दिवसांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या समस्येवर मात करण्यासाठी नुकतीच न्यूझीलंडमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर बुमराह आणखी किमान 6 महिने तरी क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी BCCI बुमराहला परत संघात घेऊ इच्छित आहे. दरम्यान अशीही माहिती समोर येत आहे की, बुमराह लवकरच एनसीएमध्ये परतणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023, MI vs RCB : मुंबईने सलग 11 व्या वेळी आयपीएलचा पहिला सामना गमावला, 5 वेळा चॅम्पियन MIचा पहिल्याच सामन्यात पराभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget