एक्स्प्लोर

Ind Vs Pak Asia Cup Final: भारताने फायनलमध्ये 'ती' मोठी चूक केली होती, तरीही पाकिस्तानने सामना हातातून घालवला; माजी खेळाडूला अश्रू अनावर

Ind Vs Pak Asia Cup Final: भारतीय संघाने आशिय कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता

Ind Vs Pak Asia Cup Final: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohmham mair) खूपच निराश झाला आहे. मॅच संपल्यानंतर त्याने सोशल मीडियावर इमोशनल व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओत मोहम्मद आमीर याने पाकिस्तानी संघाच्या (Pakistan) खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानने या सामन्यात विजयाचे आयते ताट भारतीय संघाला (Team India) वाढून दिले. पाकिस्तानसाठी खूप मोठी संधी होती. पण ही संधी पाकिस्तानने गमावली, असे मोहम्मद आमीर याने म्हटले. या व्हिडीओत मोहम्मद आमीर याला अश्रू अनावर झाले होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ind Pakistan Final Match)

अजूनपर्यंत काय झालं, हेच समजत नाही. पाकिस्तानने विजयाचा घासा आयता भारतीय संघाला दिला. पाकिस्तानी संघासाठी ही खूप मोठी संधी होती. पण त्यांनी ती वाया घालवली. आम्ही हा सामना जिंकू शकत होतो. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पाकिस्तानला फलंदाजी दिली होती. इथेच पाकिस्तानला मोठा फायदा झाला होता. अंतिम सामन्यात नेहमी फलंदाजी आधी करावी, हे माझे मत आहे. जेणेकरुन चांगल्या धावा करुन समोरच्या संघावर दबाव आणता येतो. अंतिम सामन्यात पाकिस्तानी संघाची सुरुवातही चांगली झाली होती. फायनलमध्ये तुम्ही यापेक्षा आणखी काय अपेक्षा करता? 11 षटकांत पाकिस्तानच्या 103 धावा झाल्या होत्या, फक्त एक विकेट पडला होता. फरहान आणि फकर यांनी संघाला खरोखरच खूप चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र, त्यानंतर पाकिस्तानी संघाचा डाव ढेपाळला, असे मोहम्मद आमीर याने म्हटले.

टी-20 क्रिकेटमध्ये 147 ही धावसंख्या डिफेंड करता येत नाही. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांनी दोष देता येणार नाही. 147 ही धावसंख्या पार करण्यासाठी फक्त एका चांगल्या भागीदारीची गरज असते. ट्वेन्टी-20 क्रिकटमध्ये 145 ते 150 धावा करुन जिंकण्याचा काळ गेला, हे मी गेली अनेक वर्षे सांगत आहे. प्रत्येक षटकात दहाच्या आसपास धावा करत राहून एक मोठी भागीदारी केली की ही धावसंख्या पार करणे सहज शक्य आहे. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांना कोणताही दोष देता येणार नाही. पाकिस्तानने चांगली सुरुवाती होऊनही विजयाचा घास आयता भारतीय संघाला दिला, असे मोहम्मद आमीर याने म्हटले.

आणखी वाचा

ट्रॉफी घेऊन पळाला, शाहीद अफ्रिदीने मोहसीन नक्वीला दोन पर्याय दिले; पाकिस्तानमध्ये खळबळ, काय म्हणाला?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Embed widget