एक्स्प्लोर

कोल्हापूर मनपाच्या निर्माणाधीन फायर ब्रिगेडचा स्लॅब टाकतानाच कोसळला; एकाचा हकनाक जीव गेला, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Kolhapur Municipal Corporation: स्लॅब टाकताना कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू. ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Kolhapur fire station slab collapse : कोल्हापूर महापालिकेच्या फायर स्टेशन क्रमांक पाचच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकतानाच कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एकाचा जागीच (Kolhapur slab collapse death) मृत्यू झाला होता. काल (30 सप्टेंबर) संध्याकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. कामाचा ठेकेदार शशिकांत पवारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये (Kolhapur police case against contractor) दाखल करण्यात आला आहे. मनपाचे कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.  

स्लॅब नेमका कसा कोसळला? (How Kolhapur fire station slab collapse) 

काल रात्री साडेनऊच्या सुमारास फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीचा स्लॅब टाकण्यात येत होता. मात्र, अवघ्या एका पोत्याचा स्लॅब शिल्लक राहिला असताना खाली लिफ्टच्या धक्क्याने खाली कोसळला. या घटनेत नवनाथ अण्णाप्पा कागलकर (वय 35 रा. नवश्या मारुतीजवळ, राजारामपूरी, कोल्हापूर) हे जाग्यावर मृत झाले. अक्षय पिराजी लाड, दत्तात्रय सुभाष शेंबाडे, वैभव राजू चौगुले हे गंभीर जखमी झाले, तर जया शेंबडे व सूमन वाघमारे या किरकोळ जखमी झाल्या. यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. फुलेवाडीमध्ये फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅप टाकण्यात येत होता. या कामाला सोमवारी सुरुवात झाली होती. मंगळवारी प्रत्यक्ष स्लॅब टाकण्यास सुरुवात करण्यात आली. रात्री साडेनऊच्या सुमारातील शेवटच्या पोत्याचा स्लॅब टाकला जात असताना लिफ्टचा धक्का लागल्याने अवघा टाकलेला स्लॅब खाली कोसळला. यावेळी स्लॅबवर चारजण काम करत होते, तर स्लॅबखाली दोन कामगार होते. स्लॅब कोसळताच चौघेजण दबले गेले. नवनाथ कागलकर यांचा जागेवर मृत्यू झाला.

'या कामामध्येही टक्केवारी होती का बघा' (Kolhapur Municipal Corporation negligence)

टाकतानाच स्लॅब कोसळल्याने महापालिकेच्या (Kolhapur civic body corruption allegations) कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या दोन मजली इमारतीचं काम कोल्हापुरातील रेणुका कंस्ट्रक्शन कंपनीकडे देण्यात आलं होतं. 2024 मध्ये या कामाला सुरुवात करण्याचा आदेश देण्यात आला. तीन महिन्यापूर्वी हे काम ठेकेदार शशिकांत पवारकडे आले. त्यामुळे सोमवारपासून स्लॅबच्या कामाला सुरुवात करण्याता आली होती. मात्र, हा स्लॅब टाकतानाच कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहेत. स्लॅब कोसळताच झालेल्या गर्दीमध्येही महापालिकेविरोधात (Kolhapur civic body corruption allegations) संताप व्यक्त करण्यात येत होता. या कामामध्ये टक्केवारी होती का बघा एकदा, अशी प्रतिक्रिया सुद्धा आली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election : सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
Embed widget