एक्स्प्लोर

Nilesh Ghaywal: निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात भाजपच्या चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप, शिंदे गटाच्या रविंद्र धंगेकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Nilesh Ghaywal News: नगर पोलिसांनी नॉट अव्हेलेबल एवढाच अभिप्राय पासपोर्ट कार्यालयाला कळवला होता. Ghaywal या नावातील h काढून टाकला आणि Gaywal असं केलं.

Pune Crime Nilesh Ghaywal: राज्यातील पोलीस यंत्रणेला चुना लावून लंडनला पळून गेलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन आता महायुतीमध्ये अंतर्गत कलह पेटण्याची शक्यता आहे. निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असूनही त्याला पासपोर्ट कसा आणि कोणी दिला, यावरुन सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. अशातच आता शिंदे गटाचे पुण्यातील लोकप्रिय नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे निलेश घायवळ प्रकरणात काहीच का बोलत नाहीत, असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. धंगेकर यांनी पुण्यातील गुन्हेगारीचा चेहरा असणाऱ्या निलेश घायवळ प्रकरणात थेट भाजपच्या (BJP) नेत्याला ओढल्याने आता महायुती वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (Pune Crime News)

रविंद्र धंगेकर यांनी बुधवारी 'एबीपी माझा'शी बोलताना निलेश घायवळ प्रकरणातील चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांत पाटील का बोलत नाहीत, ते गप्प का आहेत? ते  या प्रकरणात लक्ष का घालत नाहीत? असे प्रश्न शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केले आहेत. निलेश घायवळ याच्यावर राजकीय वरदहस्त आहे. त्याशिवाय त्याला पासपोर्ट कसा मिळू शकतो? पोलिसांची चौकशी व्हायला हवी. मग घायवळला कोण मदत करत आहे, हे समोर येईल. मी आता सत्तेत असलो तरी खोट्याला खोटं म्हणणारा आहे. मी पुणेकरांचे प्रश्न मांडणारा आह, असे रविंद्र धंगेकर यांनी म्हटले.

Nilesh Ghaywal Passport news: निलेश घायवळने इंग्रजी स्पेलिंग बदलली, पासपोर्ट कसा मिळवला?

निलेश घायवळ याला त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे पासपोर्ट मिळणार नाही, याची खात्री होती. निलेश घायवळ याच्यावर हत्या, अपहरण, खंडणी, अवैधरित्या शस्त्रांचा वापर अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे निलेश घायवळ याने पासपोर्टसाठी अर्ज करताना आपल्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग 'घायवळ' (Ghaywal) ऐवजी 'गायवळ' (Gaywal) असे करुन घेतले होते. मात्र, तरीही त्याला इतके गंभीर गुन्हे दाखल असताना पासपोर्ट कसा मिळाला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. एरवी सामान्य लोकांना पासपोर्ट देताना त्यांची कसून पडताळणी केली जाते. मग निलेश घायवळ प्रकरणात पासपोर्ट कार्यालय आणि नगर पोलिसांना त्याचे गुन्हेगारी चारित्र्य खटकले नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

आणखी वाचा

निलेश घायवळच्या पासपोर्टवरील आहिल्यानगरच्या खोट्या पत्त्यावर पोहोचली कोथरूड पोलिसांची टीम; परिसराची झाडाझडती

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget