IPL 2023 : मुंबईचा शानदार रेकॉर्ड, धोनीलाही नाही जमले ते रोहितने करुन दाखवले
Mumbai Indians, IPL 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आयपीएलच्या उत्तरार्धात तुफान फॉर्मत आली आहे.
Mumbai Indians, IPL 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आयपीएलच्या उत्तरार्धात तुफान फॉर्मत आली आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात मुंबईने अतिशय खराब सुरुवात केली होती. पण आता मुंबई सहाव्या चषकापासून फक्त दोन पावले दूर आहे. लखनौचा पराभव करत मुंबईने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. या विजयासह मुंबईने मोठा विक्रम नोंदवलाय. मुंबई इंडियन्समध्ये आयपीएलमध्ये लागोपाठ सात नॉकआऊट (knock-outs) सामने जिंकले आहेत. आतापर्यंत एकाही संघाला असा कारनामा करता आलेली नाही. धोनीच्या चेन्नईलाही असा कारनामा करता आलेला नाही. (Mumbai Indians became the first team to win 7 consecutive matches in IPL knock-outs)
यंदाच्या हंगामात मुंबईने दमदार कामगिरी केली. विशेषकरुन दुसऱ्या टप्प्यात मुंबईचा संघ रंगात आला. 30 एप्रिल 2023 रोजी मुंबई गुणतालिकेत नवव्या स्थानावर होता. 24 मे रोजी मुंबईने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केलाय. चषकापासून मुंबई फक्त दोन पावले दूर आहे. क्वालिफायर दोनमध्ये मुंबईचा सामना गुजरातसोबत होणार आहे. महिनाभर मुंबईने चॅम्पियनप्रमाणे कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई संघाला प्रत्येक सामन्यात नवा मॅचविनर मिळाला.. त्यामुळे मुंबईने दमदार कामगिरी केली.
Mumbai Indians became the first team to win 7 consecutive matches in IPL knock-outs. pic.twitter.com/Nlgn36NxSt
— Johns. (@CricCrazyJohns) May 25, 2023
मुंबई 2013 मध्ये पहिल्यांदा चॅम्पियन झाली होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने आतापर्यंत पाचवेळा चषकावर नाव कोरलेय. पाहूयात रोहितच्या नेतृत्वात मुंबईची कामगिरी....
Champions in IPL 2013.
Playoffs in IPL 2014.
Champions in IPL 2015.
Champions in IPL 2017.
Champions in IPL 2019.
Champions in IPL 2020.
Qualifier 2* in IPL 2023.
रोहितपुढे हार्दिकचे आव्हान, क्वालिफायर 2 सामना कधी, कुठे पाहाल
GT vs MI Qualifier 2 Live Streaming: मुंबई आणि गुजरात संघामध्ये क्वालिफायर 2 चा सामना रंगणार आहे. यातील विजेता संघ रविवारी चेन्नईसोबत दोन हात करणार आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरातचा चेन्नईकडून पराभव झाला.. तर मुंबईने लखनौचा पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केलाय. गतविजेता आणि पाच वेळा आयपीएच चषक जिंकणाऱ्या मुंबईमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे.
IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
गुजरात (GT) आणि मुंबई (MI) यांच्यात शुक्रवारी, 26 मे रोजी सामना रंगणार आहे. क्वालिफायर 2 चा हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये धडक मारेल.