एक्स्प्लोर

IPL 2023 : आयपीएलमध्ये धोनीचा नवा विक्रम, सर्वाधिक खेळाडू धावबाद करण्याच्या यादीत 'या' क्रमांकावर

Dhoni in IPL : चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार महेंद्र सिंग धोनीनंही आयपीएलमध्ये (IPL 2023) सर्वाधिक धाव बाद करणाऱ्यांच्या यादीत आपलं नाव समाविष्ट केलं आहे.

MS Dhoni Records in IPL : इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League) चा यंदाचा 16 वा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्रत्येक सामन्यात जुने विक्रम मोडले आणि नवीन विक्रम रचले जात आहेत. आता 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नावे आणखी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात 12 एप्रिलला पार पडला. या सामन्यात कर्णधार धोनीच्या नावे नवा विक्रम नोंदवला गेला आहे. 

चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीचा 200 वा सामना

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून हा धोनीचा 200 वा सामना होता. या सामन्यात धोनीने विक्रमी कामगिरी केली आहे. धोनी आता आयपीएलमध्ये सर्वाधिक धाव बाद (Run Out) करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक खेळाडू धावबाद करण्याचा विक्रम याआधीच एका खेळाडूच्या नावे आहे. 

सर्वाधिक खेळाडू रनआउट करणार दुसरा खेळाडू

सर्वाधिक खेळाडू रनआउट करण्याच्या यादीत रविंद्र जडेजानंतर आता महेंद्र सिंग धोनीचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने आयपीएलच्या इतिहासात 22 वेळा खेळाडूंना धावबाद (Run Out) केलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने झाम्पाला धावबाद केले. तसेच या यादीत तिसरं नाव विराट कोहलीचं आहे. विराट देखील त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 19 वेळा खेळाडूंना धावबाद केलं आहे.

जडेजाच्या नावे सर्वाधिक खेळाडू रनआउट करण्याचा विक्रम

चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार रविंद्र जडेजाच्या नावावर सर्वाधिक खेळाडू रनआऊट करण्याचा विक्रम आहे. जडेजाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 23 गडी रनआउट केले आहेत. आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 22 खेळाडू नाबाद करण्यासह धोनीच्या नावे आहे.

आयपीएल 2023 (IPL 2023) मधील चेन्नई (CSK) आणि राजस्थान (RR) यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकांचा थरार पाहायला मिळाला. चेन्नई आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकावेळी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या सामन्याच्या शेवटच्या षटकात चेन्नई संघाला विजयासाठी 21 धावांची गरज होती, त्यापैकी धोनीने (Dhoni) 2 चेंडूत सलग 2 षटकार मारून सामना अतिशय रोमांचक बनवला. त्यानंतर राजस्थान संघाने हा सामना तीन धावांनी जिंकला, पण धोनीने पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या ठोके वाढवले होते, हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 : काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण! धोनी मैदानावर आल्यावर करोडो चाहत्यांनी रोखला श्वास, रेकॉर्डब्रेक प्रेक्षकांची नोंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget